मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.
कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा. यामुळे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने सुरळीत होतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि करिअरशी संबंधित समस्याही दूर होतील.अनोळखी लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका. अन्यथा, तुमच्यासाठी नुकसानीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुलाची कोणतीही हट्टी वृत्ती तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनेल. त्यामुळे योग्य शिस्त पाळणे आवश्यक आहे.व्यवसाय विस्ताराच्या योजना तयार करण्याची योग्य वेळ आली आहे. यामुळे कामगिरीही सुधारेल. कामाच्या अतिरेकामुळे नोकरी करणाऱ्या लोकांवर ताण येण्याची शक्यता.
लव फोकस – कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. प्रेमसंबंधांमध्येही दूरता येण्याची शक्यता आहे. पण तुम्ही शांत रहणं उत्तम.
खबरदारी- संसर्ग होण्याची शक्यता आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा.
लकी कलर – क्रीम
भाग्यवान अक्षर – प
अनुकूल क्रमांक – 6
तुमचं पूर्ण लक्ष पेमेंट मिळविण्यावर द्या. तुमच्या वक्तृत्वाने आणि कार्यक्षमतेने कोणतेही काम तुम्ही पूर्ण करू शकाल. सन्मान समारंभाला जाण्याचे आमंत्रणही मिळू शकते.
मनात हताश आणि नकारात्मक विचारांची स्थिती असू शकते. पैसा आल्याने खर्चही तयार होईल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका किंवा अनाठायी सल्ला देऊ नका. जवळच्या मित्रांसोबतचे संबंध बिघडू शकतात. व्यवसायात नवे प्रस्ताव मिळतील. मेहनतीचं योग्य फळ मिळेल. गुंतवणूकी करण्यासाठी योग्य दिवस. सरकारी नोकरी करणाऱ्यांना बदली संबंधीत मनाप्रमाणे बातमी मिळाल्याने आनंद होईल.
लव फोकस- घराती एक झालं की एक टेंशन येत राहील. पण, परिस्थिती संभाळण्याचे कष्ट ही तुम्हालाच घ्यावे लागतील.
खबरदारी- मानसिक तणावामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. योगासने आणि ध्यानाकडे अधिक लक्ष द्या.
शुभ रंग – नारिंगी
भाग्यवान अक्षर – ए
अनुकूल क्रमांक – 3
जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. परस्परसंवाद आणि विचारांची देवाणघेवाण यामुळेही दिनचर्यामध्ये सकारात्मक बदल घडतील. दुपारनंतर, परिस्थिती तुमच्या बाजूने अनपेक्षित लाभ घेऊन येत आहे.
लक्षात ठेवा की तुमची कोणतीही योजना सार्वजनिक करू नये. अन्यथा, चुकीच्या भावनेने दुसरा कोणीतरी त्याचा फायदा घेऊ शकतो. मुलांवर कडक नियंत्रण न ठेवता त्यांना त्यांच्या इच्छेनुसार स्वातंत्र्य द्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
आज काही व्यावसायिक महत्त्वाची माहिती फोन कॉलद्वारे प्राप्त होईल. संपर्क आणि माध्यमांद्वारेही तुम्हाला योग्य संधी मिळतील. यावेळी मार्केटिंगशी संबंधित कामे स्थगित. बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
लव्ह फोकस- जीवनसाथीसोबतच्या नात्यात गोडवा राहील. प्रेमसंबंधांमध्ये काही छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात.
खबरदारी- आरोग्य चांगले राहील. परंतु घरातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची चिंता असेल. अजिबात बेफिकीर राहू नका.
शुभ रंग – आकाशी, निळा
भाग्यवान अक्षर – स
अनुकूल क्रमांक – 8
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)