Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 11 मार्च 2023, या राशीच्या लोकांना नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 11 मार्च 2023, या राशीच्या लोकांना नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 12:11 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष

मानपमान नाट्य घडतील. विसभोळेपणा जाणवेल. एखाद्या विपरित घटनेतुन लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खूप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु, गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नातेवाईकांना दुखवू नका. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. तुमचे निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी बाबतीत दुर्लक्ष करु नका. आर्थिक गुंतवणुक काळजीपूर्वक करा.

वृषभ

मनोबल आत्मविश्वास वाढेल. साहसी निर्णय घ्याल. नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल. शासकीय योजना आमलात येतील. काही नवनवीन कल्पना सूचतील. यशवी व्हाल. फायदेशीर दिवस राहणार आहे. व्यापार, व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरीता उत्तम दिनमान आहे. कुंटुंबातील अडचणी दूर होतील. पत्नीशी चांगले संबंध राहतील. आखलेल्या योजना पूर्ण होणार आहेत. शुभवार्ता ऐकायला मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील.

हे सुद्धा वाचा

मिथुन

संपत्तीचे सौख्य लाभेल. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी, व्यापाराचे क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. भांवडाकडून सहकार्य लाभेल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. व्यवहार फायदेशीर ठरतील. कौटुंबिक वातावरण समाधानी राहील. सुख व शांतीचे वातावरण राहील. आपले मनोबल मनोधैर्य वाढेल. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनस्वास्थ लाभेल.

कर्क

जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळेल. अडकलेला पैसा मिळू शकेल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. मुलांच्या कामाकडे लक्ष राहू द्या. प्रकृतीची काळजी घ्या. महत्वाची कामे आज पूर्ण कराल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःला सिद्ध कराल. प्रगतीकारक दिनमान आहे.

सिंह

कामे यशस्वीपणे पार पडतील. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर, निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील. परदेशभ्रमण घडेल. कामासाठी दुरचे प्रवास घडतील. कोणतेही काम जबाबदारीने करावे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. दिनमान उत्तम राहील.

कन्या

कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. कोणावरही अंधविश्वास बाळगू नका. भावनेच्या आधारावर कोणताही निर्णय घेऊ नका. दिनमान शुभ आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.

तुला

नोकरीत कामकाजात सुधारणा होईल. कायदेशीर बाबीकडे लक्ष दयावे लागणार आहे.ताणतणाव वाढणार नाही, याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात मनमानी करु नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवहारात नम्रता व सहनशिलता ठेवा. मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. अधिकारी लोकांशी नवीन संबंध जुळतील. कुटुबांतील सदस्याच्या आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा.

वृश्चिक

नवीन प्रकल्प, कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होईल. नोकरीत काम यशस्वी पार पडतील. महिलावर्गास प्रतिकारक दिनमान आहे. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. जबाबदारीने कामे केल्यास भाग्याची साथ लाभेल. मित्रमैत्रिणीमध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. व्यापारात नफ्यात वाढ होणार आहे. कौटुंबिक सौख्य ही उत्तम लाभेल. दुर्व्यसनांपासून सावध राहा. प्रवास सुखकर होईल.

धनु

रचनात्मक कार्यात प्रगती होईल.अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल. आज कार्य वेळेवर पूर्ण होतील. प्रवासाचे योग प्रबळ आहे. प्रवासातून लाभ होणार आहे. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ चांगले होतील. कलाकारांना अनुकुलता लाभेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची प्रगती होईल.

मकर

उर्जावान दिनमान आहे. नोकरीत महत्वाची कामे मार्गी लागतील. केलेल्या कामाचा योग्य मोबदला पदरी पडेल. स्वतःच्या मनाने निर्णय घ्यावेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल लागेल. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल. सामाजिक राजकीय कार्यातून लाभ होईल. आपल्या कार्यात मग्न राहा. सफलतापूर्वक दिनमान आहे. व्यापार आणि व्यवसायानिमित्त दूरवरचे प्रवास होतील. प्रवासातून लाभ होईल. संशोधनात्मक कार्य घडतील. मानसन्मान मिळेल.

कुंभ

जुन्या व्याधी उद्भभवण्याची शक्यता आहे. स्वःतावर नियंत्रण ठेवा. नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत. आज कर्ज घेणे टाळा. व्यापारात महत्वाचा व्यवहार करू नये. कर्जप्रकरण नामंजूर होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावेत.अंहमपणा वाढीस लागेल. मानसिक संघर्ष निर्माण होईल. दूरवरचे प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभावते.

मीन

शारिरिक त्रास होईल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग घडतील. व्यापारात अडचणी त्रास आणि योजनेस विलंब होण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ठेवा. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. स्वभावात अहंकारवृत्ती वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. पत्नीच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.