Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 20 जुलै 2023, या राशीच्या लोकांना व्यवसायात अनुकूल असे यश मिळेल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना आर्थिक योग उत्तम आहेत. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 20 जुलै 2023, या राशीच्या लोकांना व्यवसायात अनुकूल असे यश मिळेल
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 12:01 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आज आपणास उर्जात्मक आणि सकारात्मक दिनमान राहील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्ट्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे कराल. व्यापारात अचानक सफलता मिळेल. नोकरीत स्पष्ट भुमिकेमुळे आपल्या हातून योग्य कामे होतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. संततीकडून समाधान लाभेल. सामाजिक सांस्कृतिक कार्यात सहभाग व्हाल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल.

वृषभ

आज रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. काहींना पगारवाढ व बदलीची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल.  मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील.

हे सुद्धा वाचा

मिथुन

आज मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. आपल्या कार्यक्षेत्रात क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल.   नातेवाईकांसोबत स्नेह वाढेल. निरनिराळ्या कल्पना सुचणाच्या कल्पना आमलात आणा.

कर्क

आज चंद्रबल पीडादायक असणार आहे. नोकरी रोजगारात फार मोठा धोका पत्करणे योग्य ठरणार नाही. मनावर संयम ठेवा. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. जोखमीचे काम आज करू नका. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. सावधतेने वाटचाल करावी. एखादा प्रकरणात विनाकारण गुंतले जावू शकता. वाईट संगत आगलट येईल. दुरचे प्रवास शक्यतो टाळा. वाहने सावकाश चालवा.

सिंह

आज रोजगारात एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायदयाची जाणवेल. काही नवीन आलेले प्रस्तावाचे स्वागत केले जाईल. योजलेली काम वेळेत पूर्ण होतील. खर्च वाढणार आहे. परंतु उत्पन्नात वाढ होईल. महिला वर्गाशी सौजन्याने वागा. नवदांपत्यास आंनदाची बातमी मिळेल. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार मात्र टाळावेत. व्यापारात भागीदारांकडून नवीन प्रस्ताव येतील.

कन्या

आज विचारअंतीच निर्णय घ्यावेत. रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील. आपल्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. विरोधक निर्माण होईल. त्यांच्याकडून त्रास होईल. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत  व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. कागदोपत्री व्यवहार तपासून पहावा.

तुला

आज आपल्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. व्यापारात काहींना अचानक धनलाभाच्या संधी मालामाल करतील. नोकरीत व्यापारात चांगले काहीतरी करण्याची मानसिकता निर्माण होईल. संततीकडून  शुभ संदेश मिळतील. नवीन क्षेत्राची आवड निर्माण होईल. दिर्घकालीन सहलीचा आनंद सहकुटुंब लुटाल. अविवाहितांना विवाह योग आहे. शासकीय कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक संबंध राहतील. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल.

वृश्चिक

आज आपणास मनोइच्छित यश आणि फळ मिळणार आहे. घर नविन वस्तु खरेदी करण्याचा योग आहे. व्यापारी वर्गाला आपले व्यापार कौशल्य सिद्ध करता येईल. महत्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. मनोबल वाढेल. मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. घरात धार्मिक कार्य घडतील. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल.

धनु

आज रोजगारात कामाच्या पद्धतीत बदल कराल. नवनवीन प्रयोग आमलात आणाल. समाजात मानसन्मान वाढेल. नोकरीत विशेष संधी उपलब्ध होईल. मित्राकडून सहकार्य लाभेल. नाते वाईकांचे भांवडाचे विशेष सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळणार असून व्यापारात फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. आर्थिकदृष्या काळजीपूर्वक व्यवहार करावेत.

मकर

आज उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिनमान असेल. कुटुंबात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायातील योजना गुप्त ठेवा. काही विशेष कामा निमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे नियोजन आखावे लागेल. व्यवसायात अनुकूल असे यश मिळेल. आर्थिक योग उत्तम आहेत. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. कुंटुबातील पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले आहे. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण राहिल.

कुंभ

आज मनोबल ठिक राहणार नाही. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. वादविवादामुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. विचार पूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. आर्थिक हानी नुकसान  फसवणुक होण्याची शक्यता आहे.

मीन

आज नियोजित कार्य पूर्ण होणार आहेत. सहकारी वर्गाकडून कामात मदत मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत मोठे लाभ होतील. नवीन व्यक्तींशी परिचय वाढेल. आपल्या कामात त्याच्या उपयोग करून घेऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. आर्थिक लाभ होतील. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. मान सन्मानात वाढ होईल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.