Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 18 जूलै 2023, या राशीच्या लोकांना नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल

आजचे राशी भविष्य जाणून ध्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांच्या नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. शत्रुवर मात कराल. कोर्टकचेरीच्या कामास गती मिळेल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 18 जूलै 2023, या राशीच्या लोकांना नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 12:01 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष

देव आणि धर्माविषयी विशेष आस्था निर्माण होईल.तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखन प्रकाशित होईल. स्पर्धापरिक्षेत यश संपादन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. बँकेत व्यवहार करताना जपून करावा. मुलांकडून समाधान लाभेल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. दुरवरचे प्रवास लाभदायक होतील.

हे सुद्धा वाचा

वृषभ

मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा. आपल्या स्वभावात चंचलता चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. शस्त्रक्रीया सारखा घटना संभवतात. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. नोकरीत अत्यंत सावधानीपूर्वक वाटचाल ठेवावी. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा.

मिथुन

स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे.भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्‌भवतील. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान असेल.

कर्क

काहीसा अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.मोठे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.

सिंह

नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आपल्या कार्य क्षेत्रात यश संपादन कराल. नोकरीतील बदल मोठे फायदेशीर ठरतील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. पत्नीसोबत गोडी व दुरावा असे दोही फळे अनुभवास येतील. परदेशगमन व दुरचे प्रवास घडणार आहे. सुखदायी दिवस व्यतीत कराल.

कन्या

आपला दिवस सफलतापूर्वक व्यतीत होईल. कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशीर राहिल. नोकरीत नवीन योजनेवर केलेले प्रयत्न सफल होतील. नोकरीत वरिष्ठांकडून केलेल्या कामासाठी दाद मिळेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

तुला

फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना अनुकुल दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनमनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यताआहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक

मनाजोग्या घटना घडतील. मनोधैर्य कमालीचे उचांवलेले असेल. अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरी रोजगारात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडुन समाधान मिळेल.

धनु

आज दिनमान आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहिल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये.

मकर

आज मनाला समाधान लाभेल. अश्या अनेक घटना घडतील. आपली इच्छापूर्ती व प्रलंबित कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. मान-सम्मान वाढेल. नोकरीत अचानक बदल घडतील. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.

कुंभ

आज कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नावलौकिकतेला यशाचाही जोड आज मिळणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. आजचे प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. शत्रुवर मात कराल. कोर्टकचेरीच्या कामास गती मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल अशी सफलता मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.

मीन

जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. आज मनोबल उंचावेल. व्यवहार चातुर्य आणि संयमी भुमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. नातेवाईक आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल.कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदार नोकरीत असेल तर प्रमोशन होण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.