Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 28 जुलै 2023, या राशीच्या लोकांना हितशत्रुचा त्रास जाणवेल

आजचे राशी भविष्य जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 28 जुलै 2023, या राशीच्या लोकांना हितशत्रुचा त्रास जाणवेल
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 12:01 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आज रोजगारात योगकारक दिवस आहे. आर्थिक लाभासह मानसिक सुखशांती लाभेल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. शुभ कार्यात सामील व्हाल. मान सन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. नोकरीत स्थान बदल होण्याची शक्यता आहे.

वृषभ

आज दैवी साथ लाभणार आहे. नोकरीत कामात यश मिळेल. मनोबल वाढेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. शासकीय कामात शुभ दिवस आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

मिथुन

आज वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल. अनिष्ट दिवस असणार आहे. घातपातच भय रहिल. आजार उदभवून शस्त्रक्रियासारखी घटना संभवते. दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. घरात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. अनिद्रेचा त्रास उद्भभवू शकतो. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे.

कर्क

आज समाजात मानसन्मान मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात स्नेहपूर्वक वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील.

सिंह

आज नोकरीत ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल. व्यापारात देण्याघेण्याच्या व्यवहारात सावध रहा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. उद्‌भवतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्ती मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे.

कन्या

आज नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. आपल्या कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. स्त्रींयासोबत सन्मानानं आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.

तुला

आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून व्यवसायात असणाऱ्यांची चांगली उन्नती होईल.

वृश्चिक

आज आपणास रोजगारात यश मिळाल्याने आंनदी राहाल. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल.

धनु

आज नोकरदारासाठी सफलदायक दिवस असणार आहे. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. निरनिराळ्या सुचणार्‍या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे.

मकर

आज नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. व्यापारी वर्गकरीता महत्वाचा योग. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल.

कुंभ

आज प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात निराशा जनक वातावरण राहिल.

मीन

आज नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय सेवेतील नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. लेखन कला कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.