Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 9 जुलै 2023, या राशीच्या लोकांना हाती घेतलेल्या कामाला यश मिळेल
आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आदचा दिवस. या राशीच्या लोकांनी प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करावा.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
बारा राशींचे आजचे राशी भविष्य
मेष
आज आपणास मानसन्मान मिळेल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यापारात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. पुस्तक लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल
वृषभ
आज अनुकूल दिवस आहे. रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार-व्यवसायात तेजी राहिल.एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल.
मिथुन
आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाताचे स्तोत्र वाढविण्यात यश येईल. कौटुंबिक समस्या आणी स्थावर मालमला या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहिल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भांवडाशी चांगले संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील.
कर्क
आज आपणास गतकाळातील केलेल्या कार्यातून आकस्मिकरित्या धनलाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. वादविवाद संपुष्टात येतील. नोकरीत मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. देवधर्म व अध्यात्म याविषयावर आस्था वाढेल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. शारिरिक स्वास्थ बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी.
सिंह
आजच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. नोकरीत कामाप्रती सजग रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. विदयार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. गृहस्थी जीवन जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आपली कामे व्यवस्थित नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत घार पाडाल.
कन्या
आज यशदायक दिनमान असेल. नवीन वस्तु खरेदीचा योग आहे. यशप्राप्ती लाभेल. पैशाची कामे मनासारखी घडतील. आपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. कुटुंबात स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल.
तुळ
आज भाग्योदयकारक दिनमान आहे. नोकरीत कामात यश मिळेल. मनोबल वाढेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल. समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. आध्यात्मिक कार्य घडेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. शासकीय कामात शुभ दिवस आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वाटचाल करा.
वृश्चिक
आज प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणे नामंजूर होतील. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. हानीकारण दिनमान आहे. लेखी कागदपत्राशिवाय मोठे व्यवहार टाळावेत. शक्यतो प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते.
कुंभ
आज दुरवरचे प्रवास या दृष्टीने योग्य काळ आहे. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल.
मकर
आज ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. कायदा व नियमच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता आहे.
धनु
आज रोजगारात सहकाऱ्यांकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील.हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. मित्रमैत्रिण नातेवाईकांकडून सहकार्य लागेल.
मीन
आज कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होणारं आहे. आपल्या पत्नीकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)