Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 17 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांचे मोठे प्रकल्प मार्गी लागतील
आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी मिळेल.
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आजचे बारा राशींचे राशी भविष्य
मेषः
आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. प्रतिभेस वाव मिळेलं. कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढ़नी मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकेल. व्यापारवर्गा साठीही अनुकुल वातावरण आहे.धनप्राप्तीत वाढ होईल. नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी योग दिनमान आहे. संततीकडून समाधान लाभेल. गृहसौख्य उत्तम राहील. विद्यार्थीवर्गास विदेश भ्रमणात यश व लाभ होतील.
वृषभ:
कलह वादविवादाचे पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आज वाहन घर खरेदी व्यवहार टाळा. मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात गुतले जाल. रोजगारात व्यापार उद्योगात व्यवहार जपुन करावेत. आर्थिक हानी संभवते. स्वभावात मानीपणा अहंकार आणी भोगी विलास मनोवृत्ती बळावेल. धरसोड वृत्ती टाळा. कौटुंबात वाद-विवाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. हितशत्रु पासुन सावध रहा. आरोग्य संभाळा.
मिथुन :
विद्वत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. राजाश्रय मिळेल. सामाजीक व्यक्तींना पद मानसन्मान वाढेल. भातृसौख्यच उत्तम लाभेल. भांवडाकडून मोठं सहकार्य मिळणारआहे. नोकरी व्यवसायात भरभराटीचा दिवस आहे.मनाजोग्या घटना घडतील. घरात धार्मिक कार्य मंगलकार्य होईल. आनंदाच प्रसन्न वातावरण राहिल. संततीविषयी चिंता मिटेल. शुभप्रद घटना घडतील. कौटुंबिक प्रेम चांगले मिळेल. दिनमान उत्तम राहिल. संततीकडून सुख समाधान लाभेल.
कर्क:
मानसिक त्रास व कटकटी वाढतील. बरेच काही करण्याची इच्छा राहिल. पण आज धोका पत्करू नये. नोकरीत नवनवीन कल्पना येत असल्या तरी बरेच काही गमवावे लागेल. चिंतन व कर्मयोग महत्वाचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नये आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.उत्पन्नापेक्षा अधिक खर्च असी स्थिति आज राहणार आहे. मनामध्ये कुंटुंबातील सदस्याप्रती चिंता निर्माण होईल. अकारण एखाद्या प्रकरणात गुंतले जाल. संयम ठेवा. अपघात भय संभवते. आरोग्य संभाळा.
सिंह:
शुभवार्ता ऐकायला मिळतील. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. आपण हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापारीवर्गातील उत्त्पन्नात वाढ होईल. मोठे प्रकल्प मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची सुरवात करा.चांगल्या कल्पक योजना मांडा. आज यश प्राप्त होईल.मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य मिळेल.मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थीवर्ग संतती करिता हा दिवस सुखप्रद आहे. प्रवास आनंददायक होतील.लाभदायक दिनमान आहे. मन शांत ठेवा. स्थिर ठेवा.
कन्या:
संधीचा फायदा घ्या. केतूच्या नक्षत्रातिल भ्रमण आकस्मिक धनलाभ घडवेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी, व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील. त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या बोलण्यावर आणि संशयीवृत्तीवर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. प्रगतीकारक दिनमान आहे. आकस्मिक धनलाभ घडतील. मनस्वास्थ संभाळा.
तुला:
नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. यश लाभेल. दिर्घकालिन केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. लाभदायक दिनमान आहे.
वृश्चिक:
मनोबल फारसे चांगले राहणार नाही. मानसिक त्रास व कटकटी वाढतील. बरेच काही करण्याची इच्छा राहिल. पण आज धोका पत्करू नये. नोकरीत नवनवीन कल्पना येत असल्या तरी बरेच काही गमवावे लागेल. चितन व कर्मयोग महत्वाचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नये आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.उत्पन्नापेक्षा अधिक खर्च असी स्थिति आज राहणार आहे. मनामध्ये कुंटुंबातील सदस्याप्रती चिंता निर्माण होईल. अकारण एखाद्या प्रकरणात गुंतले जाल. संयम ठेवावा. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे.
धनु:
नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. यश लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तिमत्व बहरून उठेल. प्रतिमा आणि प्रतिभा उंचावेल.
मकर :
उत्साहाने काम करा. यश निश्चित लाभेल. प्रयत्नांना वेग येईल.नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. ग्रहयोगाचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. नोकरीत जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बढ़तीचे योग आहेत. व्यवसायातही आज लाभाचा दिवस आहे. मुलाखतीत यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील.प्रवासातून लाभ घडतील. आकस्मिक धनलाभ होईल.
कुंभ:
मनात प्रसन्नता राहिल. आंनददायी वातावरणात राहिल. लेखन कार्यात मानसन्मान मिळेल. कुटुंबात खर्च कराल. आत्मसुख आणि आनंदाची प्रचिती घ्याल. रोजगारात प्रगतीला पोषक दिवस आहे. नोकरी व्यवसायात काही तरी चांगले करावे अशी मानसिकता निर्माण होईल. सरकारी कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील. अविवाहितांना विवाह योग आहे. प्रयत्नाच्या जोडीला लागणारे भाग्य आज आपल्या सोबत आहे. धडाडीने केलेल्या सर्व कामात निश्चित यश मिळणार आहे. भांवडाकडून,नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. नवीन प्रस्तावात लाभ होतील.
मीन:
घरात नातेवाईकांचे आगमन होईल. संततीकडूनही समाधानकारक स्थिती राहिल. आज स्वताःवरचा विश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी येतील. सहकाऱ्यांची साथ लाभेल. भागीदारीत उत्तम सहकार्य लाभेल. सरकारी कामात यश येईल. वातावरण अनुकुल आहे. आर्थिक उत्पन्न वाढीस लागेल. समोरच्या व्यक्तींवर आपला प्रभाव राहिल. नवे नाते संबंध जुळतील.नातेवाईकांकडून साथ मिळेल. सुखकारक दिवस आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)