30 वर्षानंतर शनिच्या कुंभ राशीत त्रिग्रही योग, तीन राशींना मिळतील अशी फळं
ग्रहांच्या गोचरामुळे एकापेक्षा अधिक एकाच राशीत येतात. कुंभ राशीत शनि, सूर्य आणि बुध ग्रह यांची युती होणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होईल. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या..
मुंबई : कुंभ राशीत 30 वर्षानंतर शनिदेव विराजमान आहेत. त्यामुळे या राशीत कोणताही ग्रह सोबतीला आला तर त्याचा विपरित परिणाम होणार यात शंका नाही. जवळपास अडीच वर्षांसाठी शनिदेव या राशीत विराजमान आहेत. त्यापैकी एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. तर इतर ग्रह कमी अधिक कालावधीनंतर गोचर करत असतात. त्यामुळे कुंभ राशीत आले की शनिच्या सान्निध्यात राहावं लागत आहे. सध्या शनिसोबत दोन ग्रहांची युती होणार आहे. एक म्हणजे सूर्य आणि दुसरा ग्रह बुध आहे. कुंभ राशीत 30 वर्षानंतर शनि, सूर्य, बुध ग्रहाची युती होणार आहे. 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 20 फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीत येईल. म्हणजेच 20 फेब्रुवारीपासून त्रिग्रही योग असणार आहे. बुध ग्रह 7 मार्चनंतर मीन राशीत प्रवेश करेल. तर सूर्य ग्रह 14 मार्चला मीन राशीत परिवर्तन करेल. त्यामुळे कुंभ राशीतील त्रिग्रही योग 16 दिवस असणार आहे. या 16 दिवसात तीन राशींच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
मेष : या राशीच्या एकादश भावात तीन ग्रहांची युती होत आहे. त्यामुळे जातकांना तीन ग्रहांचं बळ मिळणार आहे. करिअरमध्ये नवी उंची गाठण्याची संधी आहे. विदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या जातकांना या काळात गोड बातमी मिळू शकते. व्यवसायचं बोलायचं तर या कालावधीत प्रगतीची नवी दारं खुली होतील. वडिलोपार्जिक संपत्तीतून चांगला लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ : या राशीच्या दशम स्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. उत्पन्नाचं स्थान असल्याने नवी मार्ग सापडेल. हातात पैसा खेळता राहील. नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. तसेच काही किचकट कामं पूर्ण करण्यासाठी हा कालावधी उत्तम राहील. जितकी कामं या कालावधीत पूर्ण करता येतील ते करण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : या राशीच्या नवम स्थानात त्रिग्रह योग होत असून नशिबामुळे बरीच कामं होतील. एखाद्या लांबचा प्रवासाचा योग जुळून येईल. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. मनासारखा पगार आणि पद मिळत असल्याने जीव भांड्यात पडेल. आर्थिक गणितं या काळात सुलभ होतील. गुप्त शत्रूंना तुमच्या प्रगतीमुळे जळफलाट होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)