Vish Yog : सव्वा दोन दिवस कुंभेत असेल विष योगाची स्थिती! तीन राशींच्या जातकांनी जरा सांभाळून
Vish Yog : कुंभ राशीत शनि आणि चंद्राची युती होत आहे. या युतीमुळे विष योग तयार होणार आहे. सव्वा दोन दिवस कुंभ राशीत युती होत असल्याने तीन राशीच्या जातकांनी सांभाळून राहावं लागेल.
मुंबई : ज्योतिषशास्त्र हे ग्रह, नक्षत्र आणि 12 राशींवर अवलंबून आहे. कारण ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती खूप काही सांगून जाते. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. तर शनि हा मंद गतीने म्हणेज अडीच वर्षाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. आता अवघ्या काही तासात चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कुंभ राशीत चंद्र आणि शनिच्या युतीमुळे विष योग तयार होणार आहे. हा योग सर्वात अशुभ योग म्हणून गणला जातो. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना नकारात्मक परिणाम भोगावे लागणार आहेत.
चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत 6 जुलै 2023 रोजी (गुरुवार) दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी प्रवेश करेल.कुंभ राशीत शनि असल्याने विष योग तयार होणार आहे. चंद्र मीन राशीत दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल. हा विष योग 8 जुलै 2023 रोजी (शनिवार) योग संपुष्टात येईल. तीन राशींच्या जातकांनी सव्वा दोन दिवस सांभाळून राहणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत त्या…
तीन राशीच्या जातकांनी सांभाळून राहावं
कर्क : या राशीच्या जातकांना सव्वा दोन दिवस सांभाळून राहावं लागेल. कारण या राशीवर शनिच्या अडीचकीचा प्रभाव आहे. त्यामुळे या काळात अडचणीत वाढ होऊ शकते. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार आहे. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो.
कन्या : या राशीच्या जातकांनाही कठीण प्रसंगाला समोरं जावं लागेल. नोकरीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागवलं जाईल. इतकंच काय आरोपही होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जपून वागा. विनाकारण पैसे खर्च करू नका. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शक्यतो लांबचा प्रवास टाळा. अपघात होण्याची शक्यता आहे.
मीन : शनि आणि चंद्राच्या युतीमुळे या राशीच्या जातकांना सव्वा दोन दिवस त्रासाचे जातील. या कालावधीत विनाकारण वाद होऊ शकतो. तसेच चोरीची भीतीही राहील. त्यामुळे घरातील पैसे आणि ऐवज जपून ठेवा. इतकंच काय तर ऑनलाईन अमिषाला बळी पडू नका. या काळात उधारीने पैसे देऊ नका. साडेसातीचा काळ असल्याने अधिक जपून राहावं लागेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)