Gajkesari Yog 2023 : 17 मे रोजी गुरु आणि चंद्राची युती, गजकेसरी योगामुळे तीन राशींचं नशीब चमकणार

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचरासोबत शुभ अशुभ युतींचा विचार केला जातो. 17 मे रोजी चंद्र मेष राशीत प्रवेश करणार असून गजकेसरी योग असणार आहे.

Gajkesari Yog 2023 : 17 मे रोजी गुरु आणि चंद्राची युती, गजकेसरी योगामुळे तीन राशींचं नशीब चमकणार
Gajkesari Yog 2023 : 17 मे रोजी गजकेसरी शुभ योग, तीन राशींना मिळणार चंद्र आणि गुरुचं पाठबळ
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 2:35 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर गोचर करत असतो. यामुळे राशीचक्रातील काही राशींमध्ये एकापेक्षा जास्त ग्रह येतात. काही ग्रह एकत्र आल्याने शुभ, तर ग्रहांच्या युतीमुळे अशुभ योग तयार होतो. या शुभ अशुभ युतीचा सर्व राशींवर परिणाम होतो. लवकरच मेष राशीत चंद्र आणि गुरुची युती होणार आहे. 17 मे रोजी ही युती होणार असून त्याचा राशीचक्रावर परिणाम दिसेल. गजकेसरी योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या राजयोगानुसार हत्तीवर सिंहाची स्वारी असते. यामुळे हा अत्यंत शुभ योग मानला जातो. कुंडलीत गुरु चंद्रापासून केंद्र भावातून पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानावर असेल, तर योग तयार होतो.

17 मे 2023 रोजी चंद्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. मेष राशीत गुरु, राहु, बुध ग्रह असणार आहे. त्यामुले चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे गजकेसरी योग, राहु आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण योग, बुध आणि चंद्राच्या युतीमुले बुध राजयोग तयार होईल. या स्थितीचा राशीचक्रातील तीन राशींवर सकारात्मक परिणाम होईल.

या तीन राशींवर होईल सकारात्मक परिणाम

मेष : गजकेसरी योगाचा मेष राशीच्या जातकांना फायदा होईल. या राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे स्तोत्र निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

मिथुन : या राशीच्या जातकांना गजकेसरी योग लाभदायी ठरेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आत्मविश्वास दुणावेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच नातेवाईकांना दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वाद होईल असं या काळात वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा.

तूळ : या राशीच्या जातकांना गजकेसरी योगाचा फायदा होईल. तूळ राशीच्या जातकांना नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मित्रांचा चांगली साथ या काळात लाभेल. तुमच्या कामावर बॉस खूश असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.