अक्षय्य तृतीयेला ग्रहांच्या अनोख्या स्थितीमुळे ‘अखंड साम्राज्य योग’, या राशींसाठी 1 वर्षाचा कालावधी पैसा आणि प्रतिष्ठा मिळवणारा

Akhand Samrajya Yog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युती आघाड्यांमुळे शुभ अशुभ योग तयार होत असतात. आता अक्षय्य तृतीयेला गुरु ग्रहाच्या गोचरामुळे अखंड साम्राज्य योग तयार होत आहे. तीन राशींच्या जातकांना यामुळे फायदा होईल.

अक्षय्य तृतीयेला ग्रहांच्या अनोख्या स्थितीमुळे 'अखंड साम्राज्य योग', या राशींसाठी 1 वर्षाचा कालावधी पैसा आणि प्रतिष्ठा मिळवणारा
कहीं खूशी कहीं गम ! गुरु गोचरामुळे तयार होतोय अखंड साम्राज्य योग, या राशींना मिळणार नशिबाची साथ
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 2:02 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. प्रत्येक ग्रह त्याच्या स्वभावानुसार फळ देत असतो. त्यात पापग्रह आणि शुभ ग्रहांची युती म्हंटलं की त्याचे परिणाम वेगळे होतात. सध्या काही अशुभ योगांची स्थिती आहे. त्यात काही शुभ योगही घडणार आहे. त्यामुळे शुभ वजा अशुभ योग करता जे उरेल ते आपल्या राशीच्या नशिबी येणारा भोग आहे, असं समजा. 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. यामुळे शुभ समजला जाणारा अखंड साम्राज्य राजयोग तयार होत आहे. या स्थितीचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. पण तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक फायदा होईल.

ज्योतिषशास्त्रात शनि आणि गुरुचं स्थान खुप महत्त्वाचं असतं. 17 जानेवारी 2023 पासून शनिदेव आपल्या स्वराशीत आहेत. तर गुरु ग्रह 22 एप्रिलपासून मेष राशीत असणार आहेत. त्यामुळे शनि आणि गुरुच्या स्थितीमुळे अखंड साम्राज्य योग तयार होत आहे.

या राशीच्या जातकांना होईल फायदा

मिथुन : अखंड साम्राज्य योग मिथुन राशीच्या जातकांना फलदायी ठरू शकते. कारण गुरु ग्रह या राशीच्या उत्पन्न भावात गोचर करणार आहे. त्यामुळे गुरु ग्रहाची चांगली साथ मिळेल. तसेच करिअरमध्ये प्रगतीचे नवे योग चालून येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. त्यामुळे आर्थिक अडचण दूर झाल्याने कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. एक वर्षात तुमचं उत्पन्न दुपटीने वाढेल अशी स्थिती आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील.

सिंह : या राशीच्या जातकांनाही अखंड साम्राज्य योगाचा फायदा होईल. कारण गुरु ग्रह एका वर्षासाठी या राशीच्या भाग्य स्थानात गोचर करणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. कुटुंबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल. या काळात तुम्हाला जमीन किंवा नवं घर खरेदी करण्याचा योग चालून येईल. वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ उत्तम राहील.

मकर : या राशीच्या चतुर्थ स्थानात गुरु गोचर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाहन आणि प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग चालून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी असलेलं आनंददायी वातावरण तुमचा उत्साह वाढवेल. मित्र परिवाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. त्यामुळे काही अडचणीची कामं झटपट उरकाल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.