Vastu Shastra : घरात नकारात्मक शक्ती जाणवते? कापूरचा हा प्रभावी उपाय अवश्य करा

कापूरशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे. कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी तर राहतेच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. कापूर जाळल्याने (Kapoor Upay) घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते.

Vastu Shastra : घरात नकारात्मक शक्ती जाणवते? कापूरचा हा प्रभावी उपाय अवश्य करा
कापूर वडीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 1:22 PM

मुंबई : घरात नकारात्मक शक्ती असतील तर मेहनतीने केलेली कामेही बिघडू लागतात. त्या घरातील लोकं खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थितीही ढासळू लागते. लहान कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जांना चुटकीसरशी दूर करण्याचे काम करते. पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते. कापूरशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे. कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी तर राहतेच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. कापूर जाळल्याने (Kapoor Upay) घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते. कापूरमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. याशिवाय ज्योतिषीय उपायांमध्येही कापूरचा भरपूर वापर केला जातो. कपूरच्या उपायांनी ग्रह आणि वास्तु दोष दूर होतात. कपूरचे काही उपाय केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात. कापूर संबंधित या खास उपायांबद्दल जाणून घेऊया.

कापूरचे प्रभावी उपाय

  • तुमच्या सुरळीत चाललेल्या कामात अचानक बाधा आणि हाणी होत असेल तर कापूरशी संबंधित काही उपाय अवश्य करून पहा. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा. घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते. इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून पळून जातात. कापूर जाळल्याने घरात सुख-शांती राहते.
  • कापूरने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ, आरती करण्यापूर्वी, संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे. सर्व कचरा घराबाहेरील कचरापेटीत टाकावा. त्यानंतरच घरी कापूर आरती करावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते.
  • घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठीही कापूर वापरला जातो. यासाठी एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घेऊन वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ठेवा. एक कापूर संपल्यानंतर तेथे कापूरचे नवीन तुकडे ठेवा. असे काही दिवस सतत करा. कापूरशी संबंधित हे उपाय वास्तु दोष दूर करतात.
  • जन्मकुंडलीत पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील कापूरच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो. यासाठी सकाळी, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा. कापूर संबंधित हे उपाय केल्याने राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते.
  • कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापूर संबंधित उपाय करा. यासाठी आंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका. आता या पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने शनिदोष दूर होतो. कापूरच्या या उपायाने मार्गात येणारे अडथळे दूर होतात, तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षावही घरात होतो.
  • झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर झोपताना उशीखाली कापूर ठेवा. यामुळे चांगली झोप लागते आणि नकारात्मक शक्तीही घरातून निघून जातात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.