Vastu Tips : घराच्या या दिशेला चुकूनही लावू नये घड्याळ, करावा लागतो वास्तूदोषाचा सामना
घड्याळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वेळेची सांगड घालण्यासाठी घड्याळ महत्त्वाची भुमीका बजावते. वास्तूशास्त्रात (Vastu Tips) घड्याळाला महत्त्वाचे स्थान देण्यात आहे आहे. चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ घरात वास्तूदोष दूर करतो.
मुंबई : आपल्या प्रत्त्येकाच्या घरात भिंतीवर घड्याळ टांगलेले असते. आपल्या दिवसाचा दिनक्रम ठरवण्यासाठी या घड्याळीचा सर्वात मोठा वाटा असतो. वास्तूशास्त्रात (Vastu Tips) घरातल्या अनेक वस्तूंना विशेष महत्त्व आहे. त्या पैकीच एक वस्तू घड्याळ आहे. वास्तूशास्त्रामध्ये प्रत्त्येक वस्तूसाठी काही विशीष्ट दिशा सांगण्यात आली आहे. वास्तूशासत्रात या सगळ्याचा संबंध उर्जेशी जोडण्यात येतो. घरात योग्य दिशेला लावलेल्या घड्याळीमुळे अनेक लाभ होतात, तर या उलट चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि परिणामी वास्तूदोष निर्माण होतो. जाणून घेऊया घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती आहे, तसेच घड्याळ्याशी संबंधीत काही महत्त्वाचे वास्तू नियम.
घड्याळ्याशी संबंधीत काही महत्त्वाचे वास्तू नियम
- वास्तूनुसार भिंतीवर घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते. पूर्व आणि उत्तर दिशांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा मुबलक संचार असतो. या दिशेला घड्याळ ठेवल्याने वेळेचा शुभ लाभ होतो. त्यामुळे प्रगतीचे मार्ग अधिक भक्कम होतात.
- पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते. याशिवाय घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात सकारात्मक विचार येतात. तर घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा सर्वाधिक प्रभाव पडतो. त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर कधीही घड्याळ लावू नये.
- घराच्या कोणत्याही दरवाजावर घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाका. वास्तविक, त्या घड्याळाखाली जाणारी कोणतीही व्यक्ती नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते. त्याचबरोबर घरातील एखादे घड्याळ तुटले असेल तर तेही काढून टाकावे. खराब घड्याळ आणि थांबलेले घड्याळ हात नकारात्मक ऊर्जा दर्शवतात.
- वास्तुशास्त्रानुसार तुटलेले किंवा थांबलेले घड्याळ कधीही घरात ठेवू नये. घड्याळ बंद ठेवल्याने गरिबी वाढते. त्याच वेळी, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती खुंडते.
- वास्तूनुसार घरामध्ये काळ्या, निळ्या आणि लाल रंगाची घड्याळे लावू नयेत. तर हलक्या हिरव्या, तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे घड्याळ घालणे शुभ मानले जाते.
- भिंतीवर घड्याळाची वेळ पुढे किंवा मागे सेट करू नका. घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ते ताबडतोब दुरूस्त करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)