Vastu Tips : झोपतांना या दिशेला चुकूनही करू नये डोकं, करावा लागतो आर्थिक समस्येचा सामना

झोपताना आपण आपले डोके कोणत्या दिशेला ठेवून झोपावे आणि आपले डोके कोणत्या दिशेला आहे याची आपण काळजी घेत नाही. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण तुम्हाला माहीत आहे का की या छोट्या गोष्टींचाही आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो.

Vastu Tips : झोपतांना या दिशेला चुकूनही करू नये डोकं, करावा लागतो आर्थिक समस्येचा सामना
वास्तू उपाय Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 8:25 PM

मुंबई : असे म्हटले जाते की चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील आवश्यक आहे. पण झोपतानाही अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. दिवसभराच्या कामानंतर रात्री झोपल्यावर जिथे जागा मिळेल तिथे आडवे पडताच डोळे लागतात. झोपताना आपण आपले डोके कोणत्या दिशेला ठेवून झोपावे आणि आपले डोके कोणत्या दिशेला आहे याची आपण काळजी घेत नाही. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण तुम्हाला माहीत आहे का की या छोट्या गोष्टींचाही आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो. पुरेशा झोपेचे महत्त्व विज्ञान आणि वास्तूशास्त्र (Vastusashtra) या दोन्हींमध्ये सांगितले आहे.

वास्तूशास्त्रानुसार  या दिशेला करावे डोकं

वास्तुशास्त्रानुसार देखील आपण आपली झोपण्याची पद्धत सुधारली पाहिजे. वास्तूनुसार झोपताना आपले डोके दक्षिण किंवा उत्तर-दक्षिण दिशेकडे असावे. म्हणजे आपले पाय उत्तर आणि पश्चिम दिशेला असावेत. या गोष्टी लक्षात ठेवून झोपलो तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार झोपेशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया.

दक्षिणेकडे तोंड करून झोपण्याचे फायदे

वास्तुशास्त्र सांगते की जर कोणी व्यक्ती दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपली तर त्याचे आरोग्य चांगले राहते. इतकेच नाही तर अनेक प्रकारच्या आजारांपासून ते दूर राहतात. हा विश्वास देखील वैज्ञानिक तथ्यांवर आधारित आहे. दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपल्याने चुंबकीय प्रवाह पायांतून शिरतो आणि डोक्यातून बाहेर पडतो, असे म्हणतात. त्यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि सकाळी उठल्यावर जड वाटतं.

हे सुद्धा वाचा

पूर्व दिशेला करा डोके

जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे डोके पूर्वेला आणि पाय पश्चिमेला ठेवूनही झोपू शकता. सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून असे करावे असे म्हटले आहे. त्याच वेळी, हिंदू धर्मात सूर्याला जीवनदाता देखील म्हटले जाते. अशा स्थितीत पूर्व दिशेला पाय ठेवून झोपणे शुभ मानले जात नाही.

झोपण्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

झोपेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खोलवर संबंध आहे. ऋषी-मुनींनी झोपण्यापूर्वी काही नियम केले आहेत. चला एकदा जाणून घेऊया त्या नियमांबद्दल.

1. शास्त्रात संध्याकाळी झोपण्यास मनाई आहे.

2. तंदुरुस्त राहण्यासाठी झोपण्याच्या दोन तास आधी जेवायला हवे. जेणेकरून व्यक्तीला पोटाचा त्रास होत नाही.

3. तातडीचे काम नसेल तर रात्री उशिरापर्यंत जागू नये.

4. असे म्हणतात की झोपण्यापूर्वी मन शांत असले पाहिजे आणि भगवंताचे ध्यान आवश्यक आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.