Vastu Tips : महिन्याच्या एक तारखेला करा हा वास्तू उपाय, कधीच भासणार नाही आर्थिक चणचण
महिन्याच्या पहिल्या तारखेला वास्तूशास्त्रातले काही प्रभावी उपाय (Vastu Tips) केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
मुंबई : आपल्या जीवनात मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकजण रात्रंदिवस मेहनत करतो. मात्र कधी त्यांना मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही तर कधी मिळालेला पैसा टिकत नाही. त्यामुळे घरात नेहमी आर्थिक तणाव असतो. घरातील सुख-शांतीही भंग पावते. अशा परिस्थितीत महिन्याच्या पहिल्या तारखेला वास्तूशास्त्रातले काही प्रभावी उपाय (Vastu Tips) केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
वास्तु टिप्स
- घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी. वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो. जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा. वास्तूनुसार, पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही. व्यापार वृद्धी यंत्र, महालक्ष्मी यंत्र आणि बिसा यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा. तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते.
- खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची महिन्याच्या पहिल्या तारखेला मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा. या दोघांची नित्य पूजा करा. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
- रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात अशी खरकटी भांडी टाकतात. वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरांमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात तिथे लक्ष्मी देवी कधीच वास करत नाही. म्हणूनच रात्री भांडी धुवा किंवा घरा बाहेर ठेवा.
- ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये, ही दिशा मंदिराची जागा मानली जाते. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते.
- जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजाघरात अवश्य ठेवा. रोज पूजा करताना हा शंख वाजवा. असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)