Vastu Tips : घरातील या वस्तूंमुळे तयार होतो वास्तूदोष, निर्माण होते प्रगतीत बाधा
घरामध्ये अशी अनेक ठिकाणे आणि वस्तू आहेत ज्यांचे पालन न केल्यास वास्तुदोष निर्माण होतात. तुमच्या घरच्या देवघरात देवी-देवतांची फाटलेली आणि जुनी चित्रे किंवा तुटलेल्या मूर्ती असतील तर त्या लगेच विसर्जित करा. यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे मानले जाते. घरात कबुतराने घरटे बनवले असेल तर ते लगेच काढून टाकावे.
मुंबई : वास्तुशास्त्र (Vastu Tips) हे उर्जेवर आधारित आहे. वास्तूनुसार घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तू आणि त्याच्या दिशेमध्ये एक ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो. सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येते. घरामध्ये अशी अनेक ठिकाणे आणि वस्तू आहेत ज्यांचे पालन न केल्यास वास्तुदोष निर्माण होतात. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरातून लगेच काढून टाकणे आवश्यक आहे, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.
वास्तूशास्त्रानुसार या वस्तू घरात ठेवू नये
- तुमच्या घरात काही तुटलेली काच किंवा आरसा असेल किंवा त्यात तडा गेला असेल तर तो लगेच बदला. तुमच्या खिडकीची काच तुटलेली असेल तर ती पण काढा.तुटलेली काच घरात नकारात्मक ऊर्जा आणते.
- तुमच्या घरच्या देवघरात देवी-देवतांची फाटलेली आणि जुनी चित्रे किंवा तुटलेल्या मूर्ती असतील तर त्या लगेच विसर्जित करा. यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे मानले जाते.
- घरात कबुतराने घरटे बनवले असेल तर ते लगेच काढून टाकावे. त्यामुळे आर्थिक प्रगतीला बाधा निर्माण होते.
- जर घरात फाटलेले किंवा जुने कपडे असतील तर ते काढून टाकावे कारण यामुळे शुक्र ग्रह कमकुवत होतो. त्यामुळे जीवनात आर्थिक समस्या सुरू होतात.
- घरातील फाटलेले आणि जुने चप्पला जोडे ताबडतोब काढून टाका कारण त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरे जावे लागते आणि त्याचा आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.
- घरामध्ये महाभारत युद्धाचे चित्र, नटराजाची मूर्ती, ताजमहालचे चित्र, बुडणारी बोट, कारंजे, जंगली प्राण्यांचे चित्र, ताजमहाल, काटेरी झाडे असल्यास ती काढून टाकावीत. यामुळे नकारात्मक भावनांचा विकास होतो, ज्यामुळे जीवनात चांगल्या घटना घडणे थांबते.
- घरातील घड्याळ बंद पडल्यास किंवा खराब झाल्यास ते घरात ठेवू नका. त्यामुळे कामात अनेक प्रकारचे अडथळे येतात.
- घरात खराब चार्जर, केबल्स, बल्ब यांसारख्या अनेक विजेच्या वस्तू पडल्या असतील तर त्या ताबडतोब काढून टाका. कारण खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात.
- घरामध्ये खराब कुलूप असतील तर हे खराब कुलूप ताबडतोब काढून टाका. कारण खराब कुलुप्याप्रमाणे माणसाची प्रगतीही थांबते.
- घरामध्ये काटेरी किंवा दूध देणारी झाडे लावू नका. या प्रकारच्या वनस्पतींमुळे आर्थिक समस्यांबरोबरच इतर समस्याही उद्भवतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)