Vastu Tips : रोजच्या जीवनातील या चुकांमुळे निर्माण होतो वास्तूदोष, करावा लागतो आर्थिक समस्यांचा सामना
दैनदिन जीवनात आपण कळत नकळत अशा अनेक चुका करतो ज्यामुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. परिणामी वास्तूदोष निर्माण झाल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. काही गोष्टी पाळल्यास या समस्या दूर केल्या जावू शकताता. ज्यामुळे वास्तूदोष दूर होऊन लक्ष्मीची कृपा लाभते.

मुंबई : सामान्यतः लोकांना वास्तुशास्त्राच्या महत्त्वाविषयी विशेष माहिती नसते, पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रातील नियम (Vastu Tips Marathi) पाळल्याने तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जा सहज नष्ट करू शकता. परंतु अनेक वेळा आपल्याकडून होणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या चुका वास्तुदोषाचे कारण बनतात. आज आम्ही तुम्हाला वास्तुदोषांसाठी कोणती खबरदारी घ्यावी हे सांगतो. हे साधेसोपे नियम पाळल्याने घरात नकारात्मक उर्जा निर्माण होत नाही. घरात सकारात्मक उर्जा राहिल्यास लक्ष्मी प्रसन्न राहते. परिणामी आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही.
अंथरुणावर बसून जेवू नका
वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर बसून जेवण करणे अत्यंत अशुभ आहे. असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. अन्नपुर्णा देवीचा देखील अपमान होतो. अंथरूणावर बसून जेवल्याने आरोग्याच्या समस्यांना समोर जावे लागते. यासोबतच झोपेशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे जेवणाच्या टेबलावर किंवा जमिनीवर बसून जेवण करणे चांगले.
रात्री स्वयंपाकघर स्वच्छ न करणे
बरेच जण रात्रीचे जेवण करतात आणि स्वयंपाकघर घाणेरडे किंवा विखुरलेले ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होते. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर आणि भांडी स्वच्छ केल्यास सकारात्मक उर्जा प्रवाहित होते. यामुळे देवी लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न राहते आणि तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. तसेच आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होत नाही.




संध्याकाळी झोपण्याची सवय
वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी झोपणे अत्यंत अशुभ आहे. संध्याकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची असते. असे करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नेहमी कोपलेली असते, त्यामुळे नेहमी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. यासोबतच घरात पैशाची कमतरता आणि गरिबी येते ज्यामुळे तुम्हाला लोकांकडून पैसे उधार घ्यावे लागतात ज्यामुळे तुम्ही नेहमी कर्जातच राहतात. यामुळे तुमच्या जीवनातील सुख-शांती नष्ट होते. संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करावा. घरात धूप फिरवावा यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)