Vastu Tips : धन लाभ आणि आर्थिक प्रगतीसाठी अवश्य करा वास्तूशास्त्रातले हे उपाय
वास्तू दोषामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, कामात अडथळा, कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद, तब्बेतीच्या कुरकुरी आणि पैशांसंबंधीच्या समस्या यासोबतच अनेक प्रकारच्या अडथळ्यांचाही सामना करावा लागतो.
मुंबई : अनेकवेळा कष्ट करूनही कष्टाचे फळ मिळत नाही. गरजा आणि महागाई वाढल्याने खर्च भागवणे कठीण होत आहे. बऱ्याचदा यासाठी घरातील वास्तू दोषही कारणीभूत असतो. वास्तू दोषामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, कामात अडथळा, कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद, तब्बेतीच्या कुरकुरी आणि पैशांसंबंधीच्या समस्या यासोबतच अनेक प्रकारच्या अडथळ्यांचाही सामना करावा लागतो. अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय (Vastu Tips) सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने धन, जीवनात प्रगती, सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. चला जाणून घेऊया वास्तुच्या या सोप्या उपायांबद्दल.
पैशाशी संबंधित गोष्टी या दिशेने ठेवा
आर्थिक सुबत्ता आणि स्थिरतेसाठी तुमची संपत्ती नेहमी नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी. या दिशेला तिजोरी, कपाट, सोने-चांदी, दागिने, आर्थिक कागदपत्रे इत्यादी वस्तू नैऋत्य दिशेला ठेवाव्यात. ही दिशा पृथ्वीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते, जी स्थिरता सुनिश्चित करते. या दिशेने ठेवलेल्या गोष्टी अनेक पटीने वाढतात. पैशाशी संबंधित गोष्टी कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका, याकडे दुर्लक्ष केल्याने आर्थिक हानी होते.
फिश पॉट या दिशेने ठेवा
घराच्या ईशान्य कोपऱ्यात फिश पॉट किंवा छोटा कारंजा ठेवणे खूप शुभ मानले जाते. ईशान्य दिशेला देवी-देवतांचा वास असतो आणि ही दिशा घरामध्ये खूप महत्त्वाची असते. या दिशेला घाण किंवा जड वस्तू ठेवू नये. पाण्याशी संबंधित वस्तू या दिशेला ठेवल्याने नशिबाचे दार उघडतात आणि धनाचा ओघही वाढतो. मात्र या ठिकाणी घाण पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. यासोबतच घरातील सर्व नळ योग्य असावेत, ते ठिबकत नसावेत.
ही दिशा स्वच्छ आणि रिकामी ठेवा
घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मस्थान म्हणतात. ही जागा ईशान्य दिशेप्रमाणेच स्वच्छ आणि रिकामी असावी. ज्ञानाअभावी बहुतेक घरांमध्ये सोफे, टेबल इत्यादी जड वस्तू या ठिकाणी ठेवतात, जे योग्य नाही. ही जागा स्वच्छ आणि रिकामी ठेवल्याने घरात धन-समृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. यासोबतच आरोग्यही प्राप्त होते.
स्वयंपाकघर या दिशेला असावे
घरातील अग्नि, आकाश, वायू, पृथ्वी आणि जल या घटकांमध्ये समतोल राखला पाहिजे. म्हणूनच अग्नीशी संबंधित वस्तू जसे की स्वयंपाकघर नेहमी दक्षिण-पूर्व दिशेच्या मध्यभागी म्हणजेच आग्नेय कोनात असावे. तसेच स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे. या ठिकाणी केशरी, लाल, गुलाबी रंग वापरावेत. तसेच, हे ठिकाण पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करा. असे केल्याने धनाची वृद्धी होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)