Vastu Tips : घरात टिकत नसेल पैसा तर अवश्य करा हे वास्तूशास्त्रातले उपाय

वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही. चला जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही.

Vastu Tips : घरात टिकत नसेल पैसा तर अवश्य करा हे वास्तूशास्त्रातले उपाय
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 6:26 PM

मुंबई : वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्त्व आहे. घरामध्ये वास्तूशास्त्राचे नियम (Vastu Tips Marathi) पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. मात्र, काही चुकांमुळे देवी लक्ष्मीही नाराजही होते. वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही. चला जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही. तसेच वास्तूदोष दूर करण्याचे काही सोपे मात्र प्रभावी उपाय.

आर्थिक आवक वाढवण्यासाठी उपाय

  • घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी. वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो. जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा. वास्तूनुसार, पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही. व्यापार वृद्धी यंत्र, महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा. तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते.
  • खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा. या दोघांची नित्य पूजा करा. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
  • रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात घरकटी भांडी ठेवतात. वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरांमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जाते तिथे लक्ष्मी देवी कधीच राहत नाही. म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवा.
  • ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये, ही दिशा मंदिराची जागा मानली जाते. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते.
  • जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजाघरात अवश्य ठेवा. रोज पूजा करताना हा शंख वाजवा. असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.