Vastu Tips : घरात टिकत नसेल पैसा तर असू शकतो वास्तूदोष
नेक वेळा कुटुंबात आर्थिक संकटामुळे पैशाची समस्या निर्माण होते. हे का होत आहे हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही. त्यापासून मुक्ती कशी मिळवायची याचा विचार प्रत्येक जण करत असतो.
मुंबई : आजच्या युगात दैनंदिन जीवनापासून ते भौतिकवादी जीवनापर्यंत पैसा महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु अनेक वेळा कुटुंबात आर्थिक संकटामुळे पैशाची समस्या निर्माण होते. हे का होत आहे हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही. त्यापासून मुक्ती कशी मिळवायची याचा विचार प्रत्येक जण करत असतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक संकट टाळता येऊ शकते, चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या टिप्स. (Vastu Tips)
वास्तु नियमानुसार काय करावे
1. घराची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर वास्तू दो दूर करण्यासाठी रामचरितमानस आणि सुंदरकांडचा नियमित पाठ करावा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाऊ लागते.
2. घरातील वास्तूदोष दूर करायचा असेल तर घराच्या एका कोपऱ्यात कापूर पेटवून ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
3. वास्तूदोष दूर करण्यासाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मुख्य दारावर दिवा लावा, यामुळे वास्तुदोषही दूर होतात. असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो.
4. वास्तूदोष दूर करण्यासाठी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करणे चांगले मानले जाते. यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.
5. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मुख्य दरवाजावर सूर्यदेव यंत्र बसवणे शुभ असते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
6. शुक्रवारी अष्ट लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा करा. ही पूजा रात्री करा. ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू शकता. यासोबतच लक्ष्मीच्या प्रिय श्रीयंत्राचीही पूजा करावी. श्रीयंत्राची पूजा करण्याबरोबरच त्यात बनवलेल्या प्रत्येक कोनाकडे पहा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटे टळतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)