Vastu Tips : आर्थिक तंगीचा करत असाल सामना, तर वास्तूशास्त्रातले नियम अवश्य पाळा

Vastu Tips खुप मेहनत करूनही अनेकांना समाधानकारक उत्पन्न लाभत नाही. तर अनेकांना कामावलेला पैसा हा टिकत नसल्याची तक्रार असते. परिणामी काही आपत्पालीन स्थितीत कर्ज घेण्याची वेळ येते. तुम्हीसुद्धा या समस्यांचा सामना करत असाल तर वास्तूशास्त्राचे हे नियम खास तुमच्यासाठी आहेत.

Vastu Tips : आर्थिक तंगीचा करत असाल सामना, तर वास्तूशास्त्रातले नियम अवश्य पाळा
वास्तूशास्त्रातले नियमImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 12:20 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेक जण पैसे कमावण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. खुप मेहनत करूनही अनेकांना समाधानकारक उत्पन्न लाभत नाही. तर अनेकांना कामावलेला पैसा हा टिकत नसल्याची तक्रार असते. परिणामी काही आपत्पालीन स्थितीत कर्ज घेण्याची वेळ येते. अनेकांना या समस्यांचा सामना घरातील वास्तूदोषामुळे देखील करावा लागतो. तुम्हालासुद्धा या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर वास्तूशास्त्रातल्या (Vastu Tip) काही नियमांच्या अवश्य अवलंब करा. वास्तूशास्त्र हे उर्जेशी संबंधीत असलेले प्राचीन शास्त्र आहे.सकारात्मक उर्जा प्रवाहित झाल्याने घरात बरकत लाभते. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया वास्तू नियम.

आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी वास्तूशास्त्रातील नियम

  • घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पंचमुखी हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो घरात स्थापित करा. घराच्या नैऋत्य दिशेला हनुमानाची प्रतिष्ठापना करा आणि रोज पूजा करा. असे केल्याने घराची आर्थिक स्थिती मजबूत होते.
  • वास्तुशास्त्रात पिरॅमिडला विशेष महत्त्व आहे. वास्तुदोष असलेल्या घराच्या दिशेला पिरॅमिड लावल्याने सुधारणा होते असे मानले जाते. घरी चांदी, पितळ किंवा तांब्याचा पिरॅमिड आणा. वास्तूशी संबंधित या गोष्टी घरात आणल्याने संपत्ती येण्याचा मार्ग मोकळा होतो. घरातील सर्व सदस्य एकत्र बसतील अशा ठिकाणी ठेवा.
  • देवी लक्ष्मीचे पद्म चिन्ह आणि भगवान कुबेर यांचे चित्र तुमच्या पूजास्थानी ठेवा. माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि भगवान कुबेर देखील संपत्ती आणि समृद्धीची देवता आहेत. वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मी-कुबेर यांचे चित्रही लावावे. याशिवाय वास्तू देवतेची मूर्ती घरात ठेवल्याने पैशाची कमतरता दूर होते.
  • वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाण्याने भरलेला भांडा ठेवणे खूप शुभ मानले जाते. घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. गुळाच्या ऐवजी लहान घागरी देखील ठेवू शकता. हा घागरी पाण्याने भरून ठेवा. वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरात कासव ठेवल्याने तुमचा भाग्योदय होवू शकतो.
  • घरातील अग्नी, आकाश, वायू, पृथ्वी आणि जल या घटकांमध्ये समतोल राखला पाहिजे. त्यामुळे अग्नीशी संबंधित वस्तू जसे की स्वयंपाकघर या नेहमी आग्नेय दिशेच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात असाव्यात. तसेच स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे. या ठिकाणी केशरी, लाल, गुलाबी रंग वापरावेत. तसेच हे ठिकाण पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करा. असे केल्याने संपत्ती वाढते आणि त्रासांपासून मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.