Vastu Tips : वास्तुदोष आहे का? तर एकही रूपया खर्च न करता करा हे उपाय
Vastu Tips Marathi आज आम्ही तुम्हाला काही वास्तु उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर तुम्ही पैसे खर्च न करता करू शकता. या उपायांनी तुम्ही वास्तू दोषांपासून मुक्त होऊ शकता.
मुंबई : घर बांधताना वास्तू लक्षात ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. अन्यथा वास्तुदोषांमुळे (Vastu Dosh) तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला काही वास्तु उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर तुम्ही पैसे खर्च न करता करू शकता. या उपायांनी तुम्ही वास्तू दोषांपासून मुक्त होऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात वास्तुदोष आहेत तर तुम्ही घराच्या ईशान्येला म्हणजेच ईशान्य कोपर्यात कलश ठेवू शकता. हिंदू धर्मात कलश हे गणेशाचे रूप मानले जाते. हेच कारण आहे की ते ठेवल्याने श्रीगणेशाची कृपा तुमच्यावर राहते.
स्वस्तिक कसे बनवायचे
घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेंदूर लावून स्वस्तिक बनवावे. स्वस्तिक बनवताना लक्षात ठेवा की स्वस्तिक नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद असावे. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
अशा प्रकारे घोड्याची नाल वापरा
वास्तुशास्त्रात घोड्याची नालही खूप शुभ मानली जाते. अशा स्थितीत नाल घरात बसवून वास्तुदोषापासून मुक्ती मिळू शकते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लावणे शुभ असते. यामुळे सौभाग्य प्राप्त होते.
येथे पंचमुखी हनुमानाचे फोटो लावा
वास्तुशास्त्रामध्ये घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असणे चांगले मानले जाते. परंतु जर तुमचे प्रवेशद्वार (घराचे मुख्य द्वार) दक्षिण दिशेला असेल तर घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा. याशिवाय प्रवेशद्वारावर पंचधातूचा पिरॅमिड लावता येतो. या उपायाने वास्तु दोषांपासूनही आराम मिळतो.
हे सोपे उपाय करा
वास्तूनुसार घराच्या आग्नेय कोपऱ्यात (दक्षिण-पूर्व) स्वयंपाकघर असणे चांगले मानले जाते. पण जर तसे नसेल तर अशा परिस्थितीत आग्नेय कोपऱ्यात छोटा लाईट तो रोज सुरू ठेवावा. यासोबतच घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरचा उपायही खूप प्रभावी ठरतो. घराच्या ज्या भागात वास्तुदोष आहे तिथे कापूर ठेवा. कापूर संपल्यावर पुन्हा तिथे ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)