Vastu tips : या पाच गोष्टी केल्याने दुर होतो वास्तूदोष, एक रूपयाही खर्च करण्याची गरज नाही‌‍!

वास्तुदोष असलेले घर नकारात्मकता, आजारपण, आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधातील समस्यांना प्रोत्साहन देऊ शकते. तुम्ही अशा जागेत राहात असाल तर काही बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे.

Vastu tips : या पाच गोष्टी केल्याने दुर होतो वास्तूदोष, एक रूपयाही खर्च करण्याची गरज नाही‌‍!
वास्तूदोषImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 7:31 PM

मुंबई : भारतीय वास्तूशास्त्र जगभरात प्रसिद्ध आहे. वास्तूदोषाच्या (Vastu Tips Marathi) संबंधीत यात अनेक उपाय सांगण्यत आलेले आहेत. वास्तूदोष म्हंटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे खर्च! मात्र असे अनेक उपाय आहेत जे कुठलेच पैसे खर्च न करतासुद्धा प्रभावी ठरतात. तुमचे घर कोणत्याही दिशेने बांधले गेले असो किंवा वास्तुनूसार हे तयार केले गेले नसेल तर, हे पाच उपाय घरातला वास्तूदोष दुर करू शकतात.

वास्तूशास्त्रातले हे पाच उपाय आहेत प्रभावी

  1.  नियमितपणे घर स्वच्छ करून घरात सुगंध दरवळत राहण्यासाठी अत्तराचा वापर करा. जिथे ते गलिच्छ आणि घाण आहे, तिथे राहू सक्रिय राहतो आणि जिथे घाणेरडा वास येतो तेथे शुक्र विचलित होतो. शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ ठेवा आणि त्यांना सुगंधित ठेवा.
  2.  उत्तर व ईशान्य दिशेने वारा आणि प्रकाशाचा मार्ग ठेवा: जर तुमच्याकडे दक्षिणेस खिडकी असेल तर एक जाड पडदा लावा. शक्य असल्यास उत्तर दिशेने प्रकाश ठेवा. जर उत्तर किंवा ईशान्येकडील खिडकीचे दरवाजे असतील तर काही विशेष काळजी घेण्याची गरज नाही.
  3.  सुंदर चित्रे, पडदे, सुंदर वस्तूंनी घर सजवा. जसे की पुष्पगुच्छ, पेंटींग, फुले, पारंपारिक पेंटिंग्ज, झुमर, पेंडेंट इत्यादी.
  4.  समोरचा दरवाजा मजबूत आणि सुंदर बनवा: घराच्या दाराची चौकट आणि उंबरठा मजबूत लाकडाने बनवा. त्यावर तोरण लावा. शुभ लाभ आणि ॐ ची प्रतीमा लावू शकता किंवा कुंकूवाने लिहू शकता. पारंपारिक मार्गाने उंबरठा बनवा आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वस्तिक लावा. आजूबाजूला सुंदर फुलांची भांडी ठेवा आणि दरवाजाची नियमित साफसफाई करा.
  5. जर घरातल्या नळातून पाणी टपकत राहिले तर ते अशुभ मानले जाते. नळातून पाणी गळत असल्यास आर्थिक नुकसान तसेच आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जर भिंतींमध्ये कुठेतरी पाणी झिरपत असेल तर ते ही वास्तूदोष निर्माण करते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.