घरात वास्तूदोष असल्यास घडताता या घटना, अशाप्रकारे करा वास्तूदोष दूर
Vastu Tips Marathi ही सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते. घर, ऑफिस किंवा आजूबाजूच्या वातावरणात ऊर्जा संतुलन बिघडले किंवा नकारात्मक ऊर्जा वाढली तर समस्या वाढतात. नकारात्मक उर्जेमुळे व्यव्हारात तोटा, तणाव, नातेसंबंधातील कलह इ. गोष्टींचा सामना करावा लागतो.

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips Marathi) प्रत्येक दिशा आणि प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते. ही सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते. घर, ऑफिस किंवा आजूबाजूच्या वातावरणात ऊर्जा संतुलन बिघडले किंवा नकारात्मक ऊर्जा वाढली तर समस्या वाढतात. नकारात्मक उर्जेमुळे व्यव्हारात तोटा, तणाव, नातेसंबंधातील कलह इ. गोष्टींचा सामना करावा लागतो. मात्र, अनेक वेळा आपण नकळत वास्तूदोष ओळखू शकत नाही. त्याचबरोबर हे वास्तुदोष प्रगतीमध्ये अडथळे बनतात आणि घरात पैसा टिकू देत नाहीत. घरावर नकारात्मक शक्तींचे वर्चस्व असते. अशा परिस्थितीत वास्तुदोषाची ही लक्षणे ओळखून त्यावर त्वरित उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.
वास्तु दोषांची लक्षणे
घरात वास्तुदोष असेल तर काही घटनांवरून तो ओळखता येतो. वास्तुदोषाची ही लक्षणे त्वरीत ओळखून त्यावर उपाययोजना करणे अधिक योग्य ठरेल.
- वास्तू दोषांनुसार घर बांधले नसेल किंवा दूषित जमिनीवर (स्मशान किंवा स्मशानभूमी) बांधले असेल तर अशा घरात राहणारे लोकं कधीच सुखी नसतात. नकारात्मक ऊर्जेमुळे अशा घरांमध्ये राहणारे लोक प्रगती करू शकत नाहीत. नेहमी आर्थिक संकटाचे बळी ठरतात. घरात अशांतता असते. त्यामुळे वास्तूचे मूलभूत नियम लक्षात घेऊनच घर बांधा. घर खरेदी करतानाही हे नियम लक्षात ठेवा.
- जर तुमचा व्यवसाय चांगला चालला असेल किंवा पुरेशा पगाराची नोकरी असेल, तरीही तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील, तर ते वास्तू दोषाचे लक्षण आहे. वास्तुदोषांमुळे सतत अनावश्यक खर्च होत असतो.
- कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय दररोज भांडणे होत असतील, घरात नेहमी अशांतता आणि तणाव असेल तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे.
- घरातील एखाद्याची तब्येत नेहमी खराब राहते आणि उपचाराचा फायदा होत नसेल तर ते वास्तुदोषाचे लक्षण आहे. याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये झोप न येणे हे देखील घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याचे लक्षण आहे.
वास्तुदोष प्रतिबंधक उपाय
वास्तू दोषाची अशी कोणतीही लक्षणे तुमच्या घरात दिसल्यास वेळीच उपाययोजना करा. यासाठी वास्तुशांतीचे पठण करण्यासाठी चांदीचे वास्तुदोष निवारण यंत्र घराच्या ईशान्य दिशेला किंवा कोपऱ्यात ठेवावे.




(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)