Vastu Tips : भेट म्हणून या वस्तू कधीच कोणाला देऊ नये, करावा लागतो आर्थिक समस्यांचा सामना
Vastu Tips आपण प्रसंगानुसार भेटवस्तू देत असलो तरी वास्तुशास्त्राच्या मते अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कधीही कोणालाही भेट देऊ नयेत. या वस्तूंचा दाता आणि भेटवस्तू स्विकारणारा यांच्यातील नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो.

मुंबई : आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना कशी भेटवस्तू द्यावी किंवा कोणती भेटवस्तू अजिबात देऊ नये यासंबंधीची माहिती आपण वास्तुशास्त्रातून (Vastu Tips) मिळवू शकतो. आपण प्रसंगानुसार भेटवस्तू देत असलो तरी वास्तुशास्त्राच्या मते अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कधीही कोणालाही भेट देऊ नयेत. या वस्तूंचा दाता आणि भेटवस्तू स्विकारणारा यांच्यातील नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच या वस्तू भेट म्हणून देऊ नये असा सल्ला दिला जातो. असे असले तरी या वस्तू स्वतःसाठी नक्कीच खरेदी करू शकता.
वास्तुशास्त्राचे नियम
वास्तुशास्त्र नकारात्मक आणि सकारात्मक उर्जेवर आधारित आहे आणि या दोन महत्वाच्या उर्जांचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी, ज्या इतरांना गिफ्ट देणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.
देवाची मूर्ती किंवा फोटो : आपण नेहमी धर्माला सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानतो आणि प्रत्येक धर्माशी संबंधित देव-देवतांच्या मूर्ती, चित्रे किंवा प्रतीकात्मक वस्तू भेट देणे शुभ मानतो, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे करणे अशुभ आहे. वास्तुशास्त्रानुसार देवाच्या मूर्ती किंवा चित्र घरात असल्यास त्यांची प्रतिष्ठापना करण्यापासून त्यांची काळजी घेण्यापर्यंत सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने हे केले नाही तर त्याचा त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. आणि ही वस्तू भेट म्हणून मिळाली तर देणाऱ्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणूनच देवी-देवतांच्या मूर्ती किंवा चित्र कोणालाही भेट देऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सक्षम आहे, तरच अशी वस्तू भेट द्या.




हातरुमाल : रुमाल देणे किंवा घेणे, एखाद्याचा रुमाल वापरणे आणि तो आपल्याजवळ ठेवणे, या सर्व परिस्थितींचा नकारात्मक परिणाम होतो. चिनी शास्त्र फेंगशुई नुसार, जर रुमाल भेट म्हणून दिला तर तो देणारा आणि घेणारा दोघांवर वाईट परिणाम होतो.
व्यवसायाशी संबंधित वस्तू : अनेकदा लोकं व्यवसायाशी संबंधित वस्तू मित्रांना किंवा त्यांच्या ग्राहकांना गिफ्ट करतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार, असे केल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायाची भरभराट दुसऱ्याला देता. त्यामुळे हे करणे टाळा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)