Vastu Tips: वास्तूच्या या 5 गोष्टी धन आणि समृद्धीसाठी आहेत खूप उपयोगी
भगवान श्रीकृष्णाची आवडती बासरी ही एक अतिशय शुभ प्रतीक मानली जाते, तसेच ती वास्तू दोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय मानली जाते. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला चांदीची बासरी ठेवावी.
बरेचदा असे ऐकले जाते की कमाई चांगली होते पण पैसा वाचत नाही किंवा तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंतेत असाल, तर याचे कारण तुमच्या घरातील वास्तुदोष (Vastu Dosh) असू शकतात. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पैशाची कमतरता दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastu Tips) पाच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे धन आणि सुखात अडथळा निर्माण करणाऱ्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर कायम राहते.
बासरी
भगवान श्रीकृष्णाची आवडती बासरी ही एक अतिशय शुभ प्रतीक मानली जाते, तसेच ती वास्तू दोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय मानली जाते. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला चांदीची बासरी ठेवावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सोन्याची बासरीही ठेवू शकता. सोन्या-चांदीची बासरी ठेवणे शक्य नसेल तर बांबूची बासरी घरात ठेवू शकता, असे केल्याने लक्ष्मीस्वरूपा राधा राणीचा आशीर्वाद घरात राहतो.
अशी गणेशाची मूर्ती
गणेश जी प्रत्येक रुपात शुभ आहे. ऐश्वर्य आणि सुखातील अडथळे दूर करण्यासाठी नाचणारी गणेशमूर्ती घरात ठेवणे खूप शुभ असते. ईशान्य दिशेला अशा ठिकाणी ठेवा जिथून सर्वांची नजर पुन्हा पुन्हा त्यावर पडेल. तुमच्याकडे मूर्ती नसल्यास, आकर्षक पेंटिंगसुद्धा ठेऊ शकता. सध्या थ्रीडी आणि फाईव्हडी पेंटिंगची क्रेझ आहे.
माता लक्ष्मी आणि कुबेर
तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती नक्कीच असेल, पण संपत्तीच्या वाढीसाठी घरात लक्ष्मीसोबत कुबेरची मूर्ती किंवा चित्र असणे आवश्यक आहे. कारण लक्ष्मी धनाचे सुख देते पण उत्पन्नाशिवाय धनाचे सुख शक्य नाही. उत्पन्न कुबेर पुरविती त्यामुळे दोघेही एकमेकांना पूरक मानले जातात. कुबेर महाराज हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत, म्हणून त्यांना नेहमी उत्तर दिशेला ठेवा.
शंख
वास्तुशास्त्रानुसार, शंखामध्ये वास्तुदोष दूर करण्याची अद्भुत क्षमता असते. जिथे नियमित शंखध्वनी होतो, तिथे सभोवतालची हवाही शुद्ध आणि सकारात्मक होते. शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या घरांमध्ये लक्ष्मीच्या हातात शंख आहे त्या घरांमध्ये लक्ष्मी स्वतः वास करते. अशा घरात पैशाशी संबंधित समस्या कधीच येत नाहीत.
कलश
नारळाला श्रीफळ म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणून नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे कलश अतिशय शुभ मानल्या जाते. ज्या घरात त्याची नियमित पूजा केली जाते त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही. धार्मिक मान्यतांनुसार ज्यांच्याघरी कलश असतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते आणि त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाही.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)