Vastu Tips : कापराचे हे उपाय आहेत अत्यंत प्रभावी, लक्ष्मी होते चूंबकाप्रमाणे आकर्षित
अनेक ग्रहदोष आणि वास्तूदोष (Vastu Tips) दूर करण्यासाठी कापूर उपाय केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात. याशिवाय घरातील काही खास ठिकाणी कापूर ठेवल्याने अनेक फायदे होतात.
मुंबई : कापूर जाळल्याने वातावरणात सकारात्मकता येते. त्यामुळे पूजेत कापूर अवश्य वापरला जातो. विशेषत: कापूर जाळून आरती करणे सनातन धर्मात अत्यंत शुभ मानले जाते. घरामध्ये रोज कापूर जाळल्यानेदेखील खूप फायदा होतो. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण राहते. नकारात्मकता दूर होते. अनेक ग्रहदोष आणि वास्तूदोष (Vastu Tips) दूर करण्यासाठी कापूर उपाय केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात. याशिवाय घरातील काही खास ठिकाणी कापूर ठेवल्याने अनेक फायदे होतात. जे लोकं आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत त्याच्यासाठी हे उपाय खुप फायद्याचे ठरतील.
सकारात्मकतेसाठी कापराचा उपाय
घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी तसेच सकारात्मकता आणि आर्थिक लाभ मिळविण्यासाठी पूजागृहात कापूर ठेवा. तो विरघळल्यावर नवीन कापूर पुन्हा ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तसेच घरातील सदस्यांना मनःशांती मिळते.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कपूराचे उपाय
जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर शुक्रवारी एक उपाय करा. यासाठी सकाळी आंघोळ करून कापूरचा तुकडा गुलाबाच्या फुलामध्ये ठेवा. त्यानंतर संध्याकाळी हा कापूर जाळून दुर्गा देवीला ओवाळा. फायदा होईल.
आर्थिक लाभासाठी कापूर उपाय
घरामध्ये बरकत आणि धन येण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात चार-पाच लवंगा आणि एक-दोन कापूर जाळावे . यामुळे घरात सुख-शांती टिकून राहते आणि कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही. हा उपाय रोज काही दिवस करा.
चांगली झोप येण्यासाठी उपाय
झोपेची समस्या असेल आणि घरात वारंवार भांडणे होत असतील तर कापूरचा तुकडा बेडरूममध्ये ठेवा. यामुळे रात्री कोणत्याही त्रासाशिवाय चांगली झोप मिळेल आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)