Vastu Tips : कर्जापासून मुक्ती पाहिजे आहे? वास्तूशास्त्रातले हे सोपे उपाय अवश्य करा
Vastu Tips : घरामध्ये वास्तुदोष असेल तर व्यक्ती नेहमी मानसिकरित्या अशांत राहतो. वास्तुदोषांमुळे अनेक वेळा व्यक्ती कर्जबाजारीही होतो. आर्थिकदृष्ट्याही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याला कर्जही घ्यावे लागते.
मुंबई : वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. वास्तुशास्त्र (Vastu Tips) हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेवर आधारित आहे. सकारात्मक उर्जेमुळे घरात सुख-समृद्धी येते तर नकारात्मक उर्जेमुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरामध्ये वास्तुदोष असेल तर व्यक्ती नेहमी मानसिकरित्या अशांत राहतो. वास्तुदोषांमुळे अनेक वेळा व्यक्ती कर्जबाजारीही होतो. आर्थिकदृष्ट्याही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याला कर्जही घ्यावे लागते. मात्र, वास्तुशास्त्रातही अशा अनेक उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी काम करतात. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रातील काही उपायांचा अवलंब करू शकता.
कर्जाच्या समस्येपासून मुक्त होण्याचे मार्ग
- घरात वास्तूदोष असेल तर आर्थिक समस्या निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या नैऋत्य भागात शौचालय बांधले असेल तर घरातील सदस्य नेहमी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. त्यामुळे चुकूनही घराच्या या दिशेला शौचालय बांधू नये.
- कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरात काच लावणे खूप शुभ मानले जाते. ही काच घराच्या किंवा दुकानाच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावी. काचेच्या रंगाचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. ते लाल किंवा मरून रंगाचे नसावे.
- कर्जातून लवकरात लवकर मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुचा हा उपाय खूप प्रभावी आहे. घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला तुमची संपत्ती ठेवा. असे केल्याने कर्जापासून मुक्ती तर मिळतेच शिवाय आर्थिक लाभही होतो.
- वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी घरात छोटे-मोठे बदल करत राहायला हवे. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाजवळ दुसरा छोटा दरवाजा लावल्याने घरात धनसंपत्ती येते.
- वास्तुशास्त्रानुसार कर्जाचा हप्ता नेहमी मंगळवारीच भरावा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने कर्ज लवकर दूर होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)