Vastu Upay: बेडरूममध्ये चुकूनही लावू नये अशा प्रकारचे फोटो, वैवाहिक जिवनावर होतो परिणाम
बेडरूममध्ये लावलेल्या काही चुकीच्या छायाचित्रांमुळे वास्तु दोष निर्माण होऊ शकतो. यासाठी, बेडरूममध्ये ही चित्रे चुकूनही लावू नये.
मुंबई, हिंदू धर्मात विवाह हा एक पवित्र विधी मानला जातो. ज्योतिषींच्या मते, वैवाहिक जिवनात काही अडचणी येऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी लग्नाआधी पत्रीका पाहिल्या जाते. वास्तूशास्त्रदेखील ज्योतीषशास्त्राशीच संबंधित एक शास्त्र आहे. यामध्ये वैवाहिक जिवन सुखकर बनविण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. बऱ्याचदा वैवाहिक जिवनातील तणावाचे कारण वास्तूदोष (Vastu Upay) असू शकतो. वास्तुशास्त्राच्या मते, बेडरूममध्ये लावलेल्या काही चुकीच्या छायाचित्रांमुळे वास्तु दोष निर्माण होऊ शकतो. यासाठी, बेडरूममध्ये ही चित्रे चुकूनही लावू नये.
हे सुद्धा वाचा
तज्ञांच्या मते, बेडरूममध्ये शुक्र आणि चंद्राचा परिणाम होतो
- वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये नदी आणि धबधब्याचे चित्र लावण्यास मनाई आहे. यासाठी, बेडरूममध्ये नदी आणि धबधब्याचे चित्र आणि पेंटींग लावू नका. यामुळे पती -पत्नीच्या नात्यात कलह निर्माण होते. एकमेकांवरील विश्वास देखील कमी होऊ लागतो.
- आपण बेडरूममध्ये राधा कृष्णाचे चित्र ठेवू शकता. हे शुभ परिणाम देते. याशीवाय अविवाहीतांनी बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावल्यास लग्नाचा योग लवकर जुळून येतो.
- बेडरूममध्ये युद्ध किंवा महाभारताचे लावू नये. वास्तु शास्त्राच्या मते, घरात युद्धाची छायाचित्रे ठेवू नये. यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. तसेच, कुटुंबात मतभेदांची परिस्थिती निर्माण होतो.
- वस्तू तज्ञ म्हणतात की, कबूतरचे चित्र बेडरूममध्ये लावू नये. यामुळे संतती प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण होतो.
- अनेक जोडपे त्यांच्या बेडरूममध्ये ताजमहालचे चित्र किंवा फोटो फ्रेम ठेवतात. वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये ताजमहालचे चित्र न ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो.
- पलंग नेहमी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असावा पण त्या दोघांच्या मध्ये नसावा. यामुळे नातेसंबंध तुटतात.
- सुंदर नात्यासाठी पत्नीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. तुमच्या खोलीचा उत्तर-पूर्व भाग अस्वच्छ नसावा याकडे लक्ष द्या.
- तुम्हाला शोपीस किंवा कला ठेवण्यात स्वारस्य असल्यास, एकटे प्राणी किंवा एकटे पक्षी यासारख्या एकट्या वस्तू ठेवू नका याची खात्री करा.
- नेहमी कबूतर किंवा देवी लक्ष्मी आणि नारायण यांसारख्या आदर्श जोडीमध्ये ठेवा. वास्तूनुसार शांत बेडरूमसाठी युद्धाची दृश्ये, राक्षस, घुबड, गरुड किंवा गिधाडे दर्शविणारी चित्रे टाळा. त्याऐवजी, हरण, हंस किंवा पोपटांची चित्रे ठेवा.
- फोटो, पोस्टर्स, मजेदार सहलींचे स्मृतीचिन्ह आणि कौटुंबिक सहली प्रदर्शित करा जे तुम्हाला चांगल्या वेळेची आठवण करून देतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)