Vastushastra Tips : परिक्षेआधी घरात स्थापित करा सरस्वती यंत्र, मिळतील सकारात्मक परिणाम

सरस्वती यंत्र घरात बसवणे शुभ असते. हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास मदत करते, एकाग्रता वाढवते आणि कलाप्रेमींना मार्ग दाखवते. ज्या मुलांना अभ्यासात रस नाही आणि स्मरणशक्ती कमकुवत आहे त्यांनाही ते घालण्याचा सल्ला दिला जातो.

Vastushastra Tips : परिक्षेआधी घरात स्थापित करा सरस्वती यंत्र, मिळतील सकारात्मक परिणाम
सरस्वती यंत्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 3:23 PM

मुंबई : वसंत पंचमी हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी 14 फेब्रुवारीला वसंत पंचमी (Basabt Panchami) आहे. या दिवशी कलांची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी देवी सरस्वती अवतरली असे म्हणतात. त्यांची उपासना केल्याने परीक्षांमध्ये यश मिळते आणि बुद्धीचा विकास होतो. याशिवाय वसंत पंचमीच्या दिवशी सारस्वत यंत्राची स्थापना करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी घरामध्ये सरस्वती यंत्र स्थापित केल्याने माता सरस्वतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहे सरस्वती यंत्र आणि ते कसे बसवायचे.

काय आहे सरस्वती यंत्र?

सरस्वती यंत्र घरात बसवणे शुभ असते. हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास मदत करते, एकाग्रता वाढवते आणि कलाप्रेमींना मार्ग दाखवते. ज्या मुलांना अभ्यासात रस नाही आणि स्मरणशक्ती कमकुवत आहे त्यांनाही ते घालण्याचा सल्ला दिला जातो.

कसं बसवायचं?

या यंत्राची शुद्धी आणि अभिषेक केल्यावरच तुम्हाला त्याचे फळ मिळू शकते. म्हणून याची स्थापना करण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून स्नान करावे. आता या यंत्रासमोर अगरबत्ती लावा. आता सरस्वती यंत्राचा गंगाजल आणि दुधाने अभिषेक करा. यानंतर कुंकू लावा आणि पिवळी फुले अर्पण करा. आता ‘ओम वागदैव्यै च विद्महे कामराजय धीमही’ 11 किंवा 21 वेळा म्हणा. तन्नो देवी प्रचोदयात् । ‘ मंत्राचा जप करा आणि ईशान्य दिशेला स्थापित करा. लक्षात ठेवा की त्याचे टोक पूर्व दिशेला असावे. रोज सकाळी उठल्यानंतर त्याची पूजा करावी.

हे सुद्धा वाचा

सरस्वती यंत्र बसवण्याचे फायदे

  • घरामध्ये सरस्वती यंत्राची स्थापना केल्याने अभ्यासात कमकुवत मुलांचा बौद्धिक विकास होतो. अभ्यासात एकाग्रता वाढते. स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि यश मिळते.
  • कलाप्रेमींनी घरामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली तर त्यांना या क्षेत्रात यश मिळते आणि खूप नावही मिळते.
  • याशिवाय कुंडलीतील दोषही दूर होतात ज्यामुळे व्यक्तीला यश मिळते आणि अडथळे दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.