Vasudev Dwadashi : उद्या वासूदेव द्वादशी, पुत्र प्राप्तीची मनोकामनो पुर्ण करण्यासाठी अशा प्रकारे करा उपासना
जे लोकं या दिवशी शुभ मुहूर्तावर व्रत करतात त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः ज्या जोडप्यांना पुत्र प्राप्तीचा आस आहे त्यांनी या दिवशी व्रत करावा.
मुंबई : वासुदेव द्वादशीच्या (Vasudev Dwadashi) दिवशी भगवान श्रीकृष्णासह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. जे लोकं या दिवशी शुभ मुहूर्तावर व्रत करतात त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः ज्या जोडप्यांना पुत्र प्राप्तीचा आस आहे त्यांनी या दिवशी व्रत आणि उपवास केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. या वर्षी वासुदेव द्वादशीचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते जाणून घेऊया.
वासुदेव द्वादशीचे महत्त्व
हिंदू मान्यतेनुसार जो कोणी वासुदेव द्वादशीचे व्रत करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. याशिवाय ज्या विवाहित जोडप्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी वासुदेव द्वादशी व्रत अवश्य पाळावे. या आषाढ महिन्याची द्वादशी 30 जून 2023 रोजी दुपारी 2.42 ते 1 जुलै 2023 रोजी दुपारी 1.77 पर्यंत असेल.
वासुदेव द्वादशी का साजरी केली जाते?
हे व्रत नारदांनी वसुदेव आणि देवकी यांना सांगितले होते. भगवान वासुदेव आणि माता देवकी यांनी आषाढ महिन्याच्या 12 व्या शुक्ल तिथीला हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले. या व्रतामुळे त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने संतती प्राप्त झाली. या व्रताचा महिमा इतका आहे की असे केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. इच्छुकांना पुत्रप्राप्ती होते. गेलेले वैभव परत मिळते.
अशा प्रकारे करा पुजा
- सर्व प्रथम, आंघोळ केल्यानंतर, स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजे.
- हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प करावा.
- वासुदेव आणि माता देवकी यांच्या मूर्तींची पूजा करावी.
- भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तींना फुले आणि फळे अर्पण करून दिवा लावा.
- विष्णु सहस्त्रनामचा जप केल्याने माणसाची प्रत्येक समस्या दूर होते.
- पूजेच्या शेवटी देवाला प्रसाद द्यावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)