Venus Transit 2022: 24 सप्टेंबरपासून सुरु होणार ‘या’ चार राशींचे सुवर्ण दिवस, शुक्राच्या कृपेने अनुभवतील लग्झरी लाईफ
शुक्राचे कन्या राशीत होणारे परिवर्तन काही राशींसाठी अत्यंत्य फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ संभवतो. याशिवाय वैवाहिक सुख देखील मिळणार आहे.
मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार 24 सप्टेंबर 2022 रोजी शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा विलास, पैसा, आनंद, प्रेम, सौंदर्य देणारा ग्रह आहे. 24 तारखेला होणाऱ्या शुक्राच्या संक्रमणाचा ( Venus Transit 2022) सर्व 12 राशींच्या जीवनाच्या प्रभाव पडेल. शुक्र ग्रह हा वृषभ आणि कन्या राशीचा स्वामी आहे, तसेच शुक्राची उच्च रास मीन आणि खालची रास कन्या आहे. त्यामुळे कन्या राशीत शुक्र प्रवेशामुळे काही राशींना फायदा तर काहींना त्रास होईल. हे राशी परिवर्तन कोणत्या राशींसाठी शुभ फलदायी ठरणार आहे जाणून घेऊया.
शुक्राच्या संक्रमणामुळे या राशींना होणार फायदा
- वृषभ: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीच्या लोकांवर शुक्र गोचराचा खूप प्रभाव राहील. कौटुंबिक समस्यांपासून त्यांना सुटका मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक चांगले होतील. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. समाजात आदर वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. पैसा मिळाल्याने सिणीच्या गोष्टींवर खर्च कराल.
- मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध आणि शुक्र हा मित्र ग्रह आहे. अशा स्थितीत कन्या राशीतील शुक्राचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठीही चांगले ठरेल. त्यांना व्यवसायात फायदा होईल. मालमत्तेतून लाभ होईल. वैवाहिक जीवन चांगले सुखदायी राहील. जीवनात ऐश्वर्या अनुभवता येईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
- कन्या : शुक्राचा राशी परिवर्तन फक्त कन्या राशीत होत असल्याने या राशीवर सर्वाधिक परिणाम होईल. उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यवसायासाठी चांगला काळ आहे. वेळ चांगला जाईल.
- तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमणही शुभ परिणाम देईल. त्यांना पैसा मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. पगार वाढू शकतो. यामुळे जीवनात आराम आणि आनंद वाढेल. लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन खूप चांगले राहील.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)