तिहार जेलमध्ये ‘या’ मंत्र्याचा थाटमाट? मसाज करायलाही माणूस? नव्या Video ने दिल्लीत खळबळ, भाजपा आक्रमक
ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली या कॅबिनेट मंत्र्याला 30 मे रोजी अटक केली होती.
नवी दिल्लीः सध्या तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे कॅबिनेट मंत्री (Delhi Minister) सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा एक नवाच व्हिडिओ समोर आला आहे. यात सत्येंद्र जैन यांच्या पायाला एक व्यक्ती मलम लावताना, मसाज करताना दिसतोय. हा व्हिडिओ ट्विट करत भाजप नेते आक्रमक झाले आहेत. आम आदमी पक्षातर्फे (Aam Admi Party) जेलमधील मंत्र्याला कशा सोयी-सुविधा दिल्या जात आहेत, यावरून भाजपने जोरदार टीका केली आहे.
भाजप प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी व्हिडिओ ट्विट केलाय. तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारकडून जेलच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये सजा ऐवजी मजा मिळत असल्याचं ट्विट त्यांनी केलंय. त्यांना व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
So instead of Sazaa – Satyendra Jain was getting full VVIP Mazaa ? Massage inside Tihar Jail? Hawalabaaz who hasn’t got bail for 5 months get head massage !Violation of rules in a jail run by AAP Govt
This is how official position abused for Vasooli & massage thanks to Kejriwal pic.twitter.com/4jEuZbxIZZ
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) November 19, 2022
तिहार जेलमधील हा व्हिडिओ असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. या फुटेजमध्ये सत्येंद्र जैन बेडवर झोपलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात काही कागदपत्र आहे. तर एक व्यक्ती त्यांच्या पायाला मालीश करताना दिसतोय.
तिहार जेलमधील मंत्र्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय, असा आरोप भाजपने यापूर्वीही केला होता. मात्र आता हा व्हिडिओ जारी करून भाजपने पुरावे सादर केल्याचं म्हटलं आहे. ईडीने यापूर्वीही अशी तक्रार केली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारचे चीफ सेक्रेटरी यांच्याकडून या प्रकरणी अहवाल मागितला होता.
आम आदमी पक्षातर्फे यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. सत्येंद्र जैन यांना अॅक्यूपंक्चर थेरपी दिली जाते. त्यांच्या शरीरातील गुंतागुंतीच्या आजारासाठी हे उपचार देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सत्येंद्र जैन यांना अनेकदा बायपेप्स लावून झोपावं लागतं. त्यामुळे औषधांसोबत त्यांना अॅक्युपंक्चर थेरपी दिली जाते, असं आपने म्हटलं आहे.
ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी अटक केली होती. तत्पूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने जैन यांचे कुटुंबीय तसेच कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती सील केली होती. त्यांनी दिल्लीत अनेक शेल कंपन्या स्थापन केल्या. कोलकाता येथे तीन हवाला ऑपरेटरच्या 54 शेल कंपन्यांच्या माध्यमातून 16.39 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.