Vish Yog 2023 : शनि आणि चंद्राच्या युतीमुळे विष योगाची स्थिती, दोन दिवस या राशींनी जरा सांभाळून

ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि शनिची युती अशुभ मानली जाते. या युतीमुळे विष योग तयार होतो. हा अशुभ योग दोन दिवस असणार आहे. याचा परिणाम काही राशींवर होणार आहे.

Vish Yog 2023 : शनि आणि चंद्राच्या युतीमुळे विष योगाची स्थिती, दोन दिवस या राशींनी जरा सांभाळून
Vish Yog 2023 : शनि चंद्राच्या युतीचा या राशींना बसणार फटका, दोन दिवस मानसिक आणि आर्थिक त्रास होणार
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 4:03 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. या गोचराचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होत असतो. कधी कधी गोचर कालावधीत शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होते. चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. त्यामुळे सर्वाधिक शुभ अशुभ युतीची या कालावधीत तयार होते. 13 मे 2023 रोजी चंद्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनि ग्रह असल्याने विष योग तयार होणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला गेला आहे.

शनि ग्रह अडीच वर्षांसाठी स्वराशी असलेल्या कुंभ राशीत स्थित आहे. तर चंद्र ग्रह 13 मे रोजी शनिवारी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत चंद्र 15 मे 2023 रोजी पहाटे 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे सव्वा दोन दिवस काही राशींसाठी अडचणीचे ठरतील. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहेत त्या..

या राशींना बसेल फटका

कर्क : या राशीच्या अष्टम स्थानात विषयोग तयार होत आहे. त्या चंद्र हा राशी स्वामी असल्याने अष्टम भावात युती करणार आहे. त्यात शनिची अडीचकी सुरु आहे. त्यामुळे या काळात नवं काम हाती घेऊ नका. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याची या काळात काळजी घ्या. गुंतवणूक या काळात करणं टाळा. तसेच वाहन देखील सावकाशपणे चालवा.

कन्या : या राशीच्या षष्टम स्थानात विषयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना जबर फटका बसेल. या काळात तुम्हाला तुमचे गुप्त शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. वाद टाळण्याचा प्रयत्न या काळात करा. कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्या. विनाकारण पैसा खर्च करू नका. न्यायालयीन प्रकरणात अपयश हाती पडू शकतं.

मीन : या राशीच्या बाराव्या स्थानात विषयोग तयार होत आहे. यामुळे या काळात अचानक प्रवास करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान तुमचा वाद होऊ शकतो. तसेच सामान चोरी होण्याचं भय राहील. तसेच काही खोटे आरोप तुमच्यावर लागण्याची शक्यता आहे. या काळात नवं काम हाती घेऊ नका. तसेच पैसे उधार देऊ नका. कारण तुम्हाला शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.