Vish Yoga : शनि आणि चंद्राच्या युतीने तयार होतोय विषयोग, या तीन राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

9 जून रोजी सकाळी 6:02 वाजता चंद्रदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. येथे शनिदेव आधीच विराजमान आहेत. या राशीत चंद्र अडीच दिवस राहील.

Vish Yoga : शनि आणि चंद्राच्या युतीने तयार होतोय विषयोग, या तीन राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध
विष योगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 11:19 AM

मुंबई : चंद्र आणि शनि यांच्या संयोगाने विष योग (Vish Yoga) तयार होतो. ज्योतिषीय गणनेनुसार 9 जून रोजी सकाळी 6:02 वाजता चंद्रदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. येथे शनिदेव आधीच विराजमान आहेत. या राशीत चंद्र अडीच दिवस राहील. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे विष योग तयार होत आहे. हा एक प्रकारचा अशुभ योग मानला जातो. या योगात तीन राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.

या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

कन्या

या राशीच्या पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी शनिदेव आहे. यावेळी शनि सहाव्या भावात विराजमान आहे. अशा स्थितीत चंद्र आणि शनीच्या संयोगाने तयार होणारा विष योग कन्या राशीच्या लोकांना अडचणीत आणू शकतो. आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. मुलांच्या करिअरची चिंता राहील. शत्रूपासून सावध राहण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला अधिक संघर्ष करावा लागू शकतो.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनात चंद्र आणि शनीच्या संयोगाने समस्या वाढू शकतात. घरातील सदस्यांमध्ये मालमत्तेबाबत वाद होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा

कुंभ

या राशीमध्ये शनि आणि चंद्र एकत्र आहेत. अशा परिस्थितीत या राशीच्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. व्यवसाय, नोकरी तसेच कुटुंबावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. कशाचाही अहंकार बाळगू नका. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहावे लागेल. नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी इष्ट देवतेची पुजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.