Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivah Muhurat : तुमच्याकडे यंदा कर्तव्य आहे? जाणून घ्या 2024 मध्ये विवाह मुहूर्त

ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासारखे विधी शुभ मुहूर्तावर करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2024 मध्ये लग्नासाठी 71 शुभ मुहूर्त आहेत. जे गेल्या तीन वर्षांतील उच्चांक आहे. यंदा 16 जानेवारीपासून सनई चौघडे वाजण्यास सुरुवात होणार आहे. कारण 16 जानेवारीला पौष महिना संपणार आहे.

Vivah Muhurat : तुमच्याकडे यंदा कर्तव्य आहे? जाणून घ्या 2024 मध्ये विवाह मुहूर्त
विवाह मुहूर्त Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 2:32 PM

मुंबई : नवीन वर्ष 2024 सुरु झाले आहे. सध्या पौष महिना सुरू असल्याने विवाह होत नाहीत, मात्र पौष महिण्यानंतर अनेकांकडे सनई चौघडे वाजणार आहे. पंचांगानुसार, 2024 मध्ये लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्त (Vivah Muhurat 2024) आहेत, विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी सर्वाधीक मुहूर्त आहेत.  हिंदू धर्मात लग्नाच्या बाबतीत मुहूर्ताला सर्वात जास्त महत्त्व आहे. शुभ मुहूर्त पाळल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही.

फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी उत्तम काळ

ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासारखे विधी शुभ मुहूर्तावर करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2024 मध्ये लग्नासाठी 71 शुभ मुहूर्त आहेत. जे गेल्या तीन वर्षांतील उच्चांक आहे. यंदा 16 जानेवारीपासून सनई चौघडे वाजण्यास सुरुवात होणार आहे. कारण 16 जानेवारीला पौष महिना संपणार आहे. विवाहासाठी सर्वाधीक शुभ मुहूर्त फेब्रुवारीमध्ये असेल. फेब्रुवारीतील संपूर्ण 16 दिवस लग्नासाठी शुभ आहेत.

शुभ विवाह मुहूर्त 2024

  • जानेवारीत एकूण 12 मुहूर्त आहेत – 16, 17, 18, 20, 21, 22, 27,28, 29, 30, 31.
  • फेब्रुवारीमध्ये एकूण 16 मुहूर्त आहेत – 01, 02, 03, 04, 05, 06, 12, 13, 14, 17, 18, 19, 24, 25, 26, 27, 29.
  • मार्चमध्ये एकूण 8 मुहूर्त आहेत – 01, 03, 04, 05, 06, 07, 11, 12.
  • एप्रिलमध्ये एकूण 9 मुहूर्त आहेत – 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
  • जुलैमध्ये एकूण 9 मुहूर्त आहेत – 09, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17.
  • नोव्हेंबरमध्ये एकूण 6 मुहूर्त आहेत – 17,18, 22, 23, 24, 25.
  • डिसेंबरमध्ये एकूण 10 मुहूर्त आहेत – 02, 03, 04, 05, 09, 10, 11, 13, 14, 15.

गृह प्रवेश मुहूर्त 2024

गृह प्रवेश मुहूर्त फेब्रुवारी 2024

  • 12 फेब्रुवारी, सोमवार, मुहूर्त: दुपारी 02:56 ते संध्याकाळी 05:44
  • 14 फेब्रुवारी, बुधवार, मुहूर्त: सकाळी 07:01 ते 10:43 पर्यंत
  • 19 फेब्रुवारी, सोमवार, मुहूर्त: सकाळी 06:57 ते 10:33 पर्यंत
  • 26 फेब्रुवारी, सोमवार, मुहूर्त: सकाळी 06:50 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 04:31
  • 29 फेब्रुवारी, गुरुवार, मुहूर्त: सकाळी 06:47 ते 10:22 पर्यंत

गृह प्रवेश मुहूर्त मार्च २०२४

हे सुद्धा वाचा
  • 2 मार्च, शनिवार, मुहूर्त: दुपारी 02:42 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:44
  • 6 मार्च, बुधवार, मुहूर्त: दुपारी 02:52 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 04:13
  • 11 मार्च, सोमवार, मुहूर्त: सकाळी 10:44 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:34
  • 16 मार्च, शनिवार, मुहूर्त: सकाळी ०६:२९ ते रात्री ९:३८
  • 27 मार्च, बुधवार, मुहूर्त: सकाळी 06:17 ते दुपारी 04:16 पर्यंत 29 मार्च, शुक्रवार, मुहूर्त: रात्री 08:36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:13 30 मार्च, शनिवार, मुहूर्त: सकाळी 06:13 ते रात्री 09:13

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.