Weekly Horoscope : सूर्याच्या संक्रमणाने नविन सप्ताहाची सुरूवात, या राशींना होणार प्रचंड
या नवीन आठवड्यात वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया नवीन आठवड्याचे राशीभविष्य.
मुंबई, फेब्रुवारीचा नवीन आठवडा (13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. या नवीन आठवड्याची सुरुवात (Weekly Horoscope Marathi) सूर्याच्या राशी परिवर्तनाने होईल. या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य देखील मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत हा आठवडा पाच राशींचे भाग्य उजळवणारा आहे. या नवीन आठवड्यात वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया नवीन आठवड्याचे राशीभविष्य.
बारा राशींसाठी कसा जाणार हा आठवडा
मेष-
या आठवड्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच बजेट बनवून फिरणे तुमच्यासाठी चांगले होईल. तुम्हाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांकडून अचानक एखादी चांगली भेट देखील मिळू शकते. शिक्षणाच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.
वृषभ-
या आठवड्यात तुम्हाला अचानक नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळतील. घरात अचानक पाहुण्यांचे आगमन झाल्याने कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता येईल. कामामुळे आणि अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे या आठवड्यात तुम्ही थोडे तणावग्रस्त असाल. जर तुम्ही उच्च शिक्षणाचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला या काळात खूप मेहनत करावी लागेल.
मिथुन-
आर्थिक स्थिती बर्याच प्रमाणात मजबूत राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. खर्चावर नियंत्रण राहील. करिअरमध्ये प्रगती करण्याची शुभ संधी मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरणही प्रसन्न राहणार आहे. आरोग्याबाबत अजिबात बेफिकीर राहू नका. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला परीक्षेत गुण मिळतील.
कर्क-
या आठवड्यात कोणत्याही कामात अनावश्यक घाई करू नका. धीर धरा. कोणत्याही गुंतवणुकीत तुमचे पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या. या आठवड्यात करिअरमध्ये पदोन्नतीच्या अनेक शुभ संधी मिळण्याची शक्यता आहे. वेळ तुम्हाला चांगली बातमी देईल
सिंह-
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पैशाची बचत करण्यात मदत होईल. तुम्ही तुमचे काही पैसे तुमच्या भविष्यासाठी बँक बॅलन्सच्या स्वरूपात जोडू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षणातून लवकर विचलित होत असल्याची तक्रार होती, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. तुमची एकाग्रता चांगली होणार आहे.
कन्या-
या आठवड्यात तुमचा खर्च वाढेल. लक्षात ठेवा की तुम्ही जे काही पैसे खर्च करत आहात, ते फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच असले पाहिजेत. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या किंवा जोडीदाराच्या मदतीने तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागेल.
तूळ-
आर्थिक बाबतीत नवीन आठवडा तुमच्या राशीसाठी चांगला जाण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी ग्रहांच्या हालचाली. जमा झालेल्या संपत्तीत भर घालण्यासाठी आणखी अनेक संधी उपलब्ध करून देण्याचे काम करेल. क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात तुमच्या आईचे आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक-
या आठवड्यात तुम्ही वेगवेगळ्या स्त्रोतांधून पैसे मिळवण्यात पूर्णपणे यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आर्थिक मदतही करू शकता. तथापि, तुम्हाला कर्जाचे पैसे मोठ्या अडचणीने मिळतील. म्हणूनच नीट विचार करून एखाद्याला कर्ज द्या. काही प्रवासातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.
धनु-
या आठवड्यात आर्थिक व्यवहार करू नका. कमी पैशाच्या लोभापायी शॉर्टकट पद्धतीचा अवलंब अजिबात करू नका. जर तुम्ही शिक्षण क्षेत्राशी निगडीत असाल तर तुम्हाला यश मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील. या दरम्यान वादविवादात पडणे टाळा. आरोग्याचीही विशेष काळजी घ्या.
मकर-
या आठवडय़ात तुमची आर्थिक हानी होऊ शकते. तुम्हाला धनहानी होऊ शकते. खर्च वाढू शकतो आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, शिक्षणाच्या दृष्टीने वेळ अनुकूल दिसत आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीत व्यस्त असलेल्यांना या आठवड्यात यश मिळू शकते.
कुंभ-
या आठवड्यात तुम्हाला पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगले पैसे मिळू शकतात ज्यातून तुम्ही सर्व आशा गमावल्या होत्या. नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमचे अपूर्ण स्वप्नही पूर्ण होईल. पण कोणतीही वस्तू खरेदी करताना घरातील वडीलधाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल.
मीन-
या आठवड्यात आरोग्य बिघडण्यासोबतच काही अशक्तपणाही येऊ शकतो. निष्काळजीपणामुळे नोकरदार किंवा व्यावसायिक दोघांचेही आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे घाईघाईत कोणतीही चूक करणे टाळा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)