Weekly Horoscope : 20 मार्च ते 26 मार्च या कालावधी 12 राशींसाठी कसा असेल? कोणाला मिळणार भाग्याची साथ जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. ग्रहांचं आणि नशिबाचं टायमिंग योग्य प्रकारे जुळून आलं अशक्यही शक्य होतं. 20 मार्च ते 26 मार्च हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

Weekly Horoscope : 20 मार्च ते 26 मार्च या कालावधी 12 राशींसाठी कसा असेल? कोणाला मिळणार भाग्याची साथ जाणून घ्या
Weekly Horoscope : 20 मार्च ते 26 मार्च हा आठवडा कसा असेल? जाणून घ्या फलज्योतिष
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 2:16 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्र ग्रहांचा स्थिती, जुळून येणारे शुभ-अशुभ योग, ग्रहांचे गोचर यावर अवलंबून असतं. कधी कधी दोन प्रकारचा योगांचा सामना करावा लागतो. शुभ आणि अशुभ योग एकाच वेळी नशिबी येतात. कारण ग्रहांची स्थिती तशी असते. त्यामुळे एकीकडे वाचण्यात येतं की चांगलं असणार आहे. तर दुसरीकडे वाचण्यात येतं की अशुभ असणार काळ असणार आहे. अशावेळी चांगलं वजा वाईट करून जे मिळतं ते म्हणजे फलज्योतिष. 20 मार्च ते 26 मार्च हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल ते जाणून घ्या. 12 राशींचं ज्योतिष यात मांडण्यात आलं आहे.

मेष : तुमच्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या काळात एखादं कठीण काम सहजरित्या पूर्ण कराल. तुमच्या कामाचं कौतुक देखील होईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो. प्रेम प्रकरणात या काळात यश मिळू शकते. वैवाहित जीवन सुखकारक होईल. काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पुढे जा. या काळात देवी लक्ष्मी लाल पुष्प आणि लाल चंदन अर्पण करून श्रीसुक्ताचं पठण करा.

वृषभ : तुमच्यासाठी हा आठवडा संमिश्र असेल. काही काम करताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीत काही अडचणी येऊ शकतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात वेळ घालवाल. या काळात अचानक तीर्थ यात्रेला जाण्याचा योग जुळून येईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात अडचण येईल.तसेच अनियंत्रित खर्च या काळात होऊ शकतो. घरात पारद शिवलिंग स्थापित करून त्याचं नित्यनेमाने पूजन करा.

मिथुन : या आठवड्यात एखादा मोठा निर्णय घेताना काळजी घ्या. आपलं आर्थिक नुकसान होणार याचा नीट विचार करा. कारण एखादा चुकीचा निर्णय व्यवसायाचं नुकसान करू शकतो. प्रवासामुळे थकवा जाणवेल. वैवाहिक जीवन आनंद राहण्यासाठी जोडीदाराचा आदर करा. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दररोज गणपतीला दुर्वा आणि सिंदूर अर्पण करून गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं.

कर्क : या आठवड्याची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीने होईल. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागेल. घरात या काळात वाद होऊ शकतो. आई वडिलांकडून अपेक्षित मदत मिळणार नाही. कोणतीही गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या. उत्साहात केलेल्या गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकतं. या काळात गाडी सावधपणे चालवा. वैवाहिक जीवनात काही कारणामुळे वाद होऊ शकतो. दररोज शंकराची आराधना करा आणि शनिवारी गरजुंना काळ्या चणे दान करा.

सिंह : या आठवड्यात एकदम सावध पावलं उचला. कारण हा आठवड्यात वाद अंगाशी येऊ शकतो. आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी काळजी घ्याल. जुना आजार या काळात डोकं वर काढू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात जोडीदाराकडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे योग्य रितीने निर्णय घ्या आणि आर्थिक व्यवहार करा. प्रेम प्रकरणात मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. दररोज विष्णु सहस्त्रनामावलीचं पठण करा आणि कपाळी केसर टिळा लावा.

कन्या : या राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र प्रतिसाद देणारा असेल. घरातील काही वाद डोकेदुखी ठरलीत. अचानक मोठ्या खर्चामुळे बजेट कोलमडून जाईल. मानसिक स्वास्थ ठिक नसल्यास लांबचा प्रवास टाळा. महिलांना आध्यात्मिक कामात आपला वेळ द्यावा. प्रेम प्रकरणात विचारपूर्वक पावलं उचला. वैवाहित जीवनात अडचणी कमी करण्यासाठी एकमेकांच्या विचारांचा आदर करा. दररोज देवी दुर्गा चालीसा वाचा. शुक्रवारी एखाद्या कन्येला सफेद रंगाची मिठाई देऊन आशीर्वाद घ्या.

तूळ : या आठवड्यातील ग्रहमान पाहता मानसिक स्थिती साथ देणारी नाही. आजचं काम उद्यावर ढकळू नका. आलसपणा झटका आणि उत्साहाने कामाला लागला. जमिनीशी निगडीत व्यवहारात त्रास होऊ शकतो. शत्रू तुमच्यावर हावी होण्याचा प्रयत्न करेल. प्रेम संबंधांसाठी हा आठवडा अनुकूल नाही. कोणतंही पाऊल विचारपूर्वक उचला. अन्यथा वादाला कारणीभूत ठरू शकतं. दररोज विष्णुंची पूजा करा आणि गुरुवारी पिवळ्या वस्तू मंदिरात दान करा.

वृश्चिक : या आठवड्यात तुम्हाला अपेक्षेप्रमाणे कमी यश मिळेल. पण काम होत असल्याने त्याच आनंद वेगळा असेल. महत्त्वाच्या कामात अनेक अडचणी येऊ शकतात. पण त्यावर मात करत काम पूर्ण होईल. प्रयत्नार्थी परमेश्वर या उक्तीप्रमाणे आपले प्रयत्न करत राहा. जीवनशैलीकडे पाहून तब्येत सांभाळा. कारण चुकीच्या जीवनशैलीमुळे मोठी समस्या उद्भवू शकते. डॉक्टरांकडे जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. दररोज हनुमानाची विधीपूर्वक पूजा करा. हनुमान चालीसाचं सातवेळी पठण करा.

धनु : हा आठवडा धनु राशीसाठी सकारात्मक असेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं काम या काळात पूर्ण होऊ शकतं. न्यायालयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी या काळात चांगली बातमी मिळू शकते. पदोन्नती तसेच मनासारखी पगारवाढ मिळू शकते.प्रेमसंबंधात अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. दररोज लक्ष्मीनारायणाची पूजा आणि विष्णु सहस्त्रनामाचा पठण करा.

मकर : ग्रहांची स्थिती आणि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु असल्याने अपेक्षित फळ मिळणार नाही. वरिष्ठ आणि कनिष्ठ लोकांशी तालमेळ ठेवून काम करा. आठवड्यातील मधला काळ आरोग्याशी निगडीत काही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तब्येतीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रेमंसंबंधात एकमेकांवर संशय घेण्यापेक्षा काही गोष्टी स्पष्टपणे सांगा. दररोज हनुमानाची पूजा करून बजरंग बाणाचं पठण करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

कुंभ : या राशीच्या जातकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही त्रास सहन करावा लागू शकतो. काही जण तुमचं कामावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करतील. या काळात तुम्ही पूर्णपणे कामावर लक्ष ठेवाल. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होईल प्रेम प्रकरणात काही अंशी अडचणी येथील. तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याबाबत काळजी घ्या. दररोज हनुमानाची उपासना करा आणि शनिवारी डोक्यावरून पायापर्यंत नारळ ओढून वाहत्या पाण्यात सोडा.

मीन : या राशीच्या जातकांना आपल्याकडे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जुना आजारामुळे काही त्रास होऊ शकतो. अचानक मोठा खर्च आल्याने बजेट बिघडू शकते. छोटा भाऊ किंवा बहिणीकडून त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्ध चांगला जाईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रेम प्रकरणातील अडचणी दूर होतील. वैवाहिक जीवन सुखकर होईल. दररोज विष्णुंची पूजा करून नारायण कवचाचं पठण करा. गुरुवारी मंदिरात गुळाचं दान करा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.