स्वप्नात स्वत:चा मृत्यू पाहाणं याचा अर्थ काय? स्वप्न शास्त्र काय सांगतं?
प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडते. काही स्वप्नं चांगली असतात, तर काही स्वप्न वाईट अनुभव देणारी असतात. प्रत्येक स्वप्न काही तरी विशिष्ट संकेत देतं अस स्वप्न शास्त्रात म्हटलं आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडते. काही स्वप्नं चांगली असतात, जसे की स्वप्नात स्वत:ला लॉटरी लागल्याचं पाहाणं, घरात मोठ्या प्रमाणात संपत्ती आल्याचं स्वप्न या सारखे अनेक स्वप्न असतात. मात्र काही स्वप्न हे दुख:द अनुभव देणारे असतात. अशी स्वप्न तुम्हाला पडल्यास तुम्हाला भीती वाटू शकते. स्वप्न शास्त्रात असं सांगितलं आहे की, एखाद्या व्यक्तीला जी स्वप्न पडतात त्याचा एक विशिष्ट अर्थ असतो. अशी स्वप्न आपल्याला कोणतातरी संकेत देत असतात. अनेकदा आपल्याला असंही स्वप्न पडतं की आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीच निधन झालं आहे. जाणून घेऊयात या स्वप्नाचा नेमका अर्थ काय होतो?
स्वप्नात स्वत:चा मृत्यू पाहाणं
स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात तुमचाच मृत्यू झाला आहे असं पाहिलं तर ते एक शुभ स्वप्न असतं. स्वप्न शास्त्रानुसार असं स्वप्न पडल्याचा अर्थ असा असतो की तुम्ही दीर्घायुष्यी झाला आहात. एवढंच नाही तर तुमच्यावर भविष्यात जी संकट येणार होती ती आता टळली आहेत. सोबतच तुम्हाला भविष्यात धन प्राप्तीचा योग आहे. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. जर स्वप्नात तुम्ही स्वत:ला आत्महत्या करताना पाहिलं तर ते देखील एक शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ देखील तुम्हाला दीर्घायुष्य मिळणार असून अचानक धनलाभ होणार आहे असा होतो.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू स्वप्नात पाहाणं
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असं पाहिलं, तर ते देखील एक शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वप्नात ज्या व्यक्तीचा मृत्यू होताना पाहिलं आहे, त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभतं. जर त्या व्यक्तीला एखादा आजार असेल तर त्या आजारातून ती व्यक्ती लवकरच बरी होणार आहे, असे संकेत देखील त्यातून मिळतात. तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात एक नवी सुरुवात करणार आहे असा त्याचा अर्थ होतो, असं स्वप्न शास्त्र सांगतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)