Shani Jayanti 2023 : शनि जयंती कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

वैशाख महिन्याला माधवमास असंही संबोधलं जातं. त्रेतायुगाचा प्रारंभ या दिवसापासून झाला होता. वैशाख अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाते. चला जाणून घेऊयात या दिवसाचं महत्त्व...

Shani Jayanti 2023 : शनि जयंती कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Shani Jayanti 2023 : वैशाख अमावस्येला शनि जयंतीसह खास योग, जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 3:19 PM

मुंबई – ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शनिदेव एकदा राशीत आले की, आपल्या कर्मानुसार फळं देतात. पंचांगानुसार शनि जयंती वैशाख अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे. शनिदेव सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत. तसेच यम आणि यमुना त्यांचे भाऊ बहीण आहेत. यंदा शनि जयंती 19 मे 2023 रोजी शुक्रवारी आहे.शनि जयंतीला विधीवत पूजा करू न साडेसाती, अडीचकी आणि महादशेच्या अशुभ प्रभावातून सुटका मिळवता येते.

शनि जयंती तिथी

वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी 18 मे रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी सुरु होईल आणि 19 मे रोजी रात्री 9 वाजून 22 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार शनि जयंती 19 मे 2023 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शोभ योग तयार होत आहे. हा योग शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो. शनि जयंतीच्या दिवशी शोभन योग संध्याकाळई 6 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल.

शनि जयंतीचं महत्त्व

शनिदेवांना न्यायदेवता संबोधलं गेलं आहे. शनिदेवांना नवग्रहांमध्ये प्रमुख स्थान प्राप्त आहे. सर्वात धीमा गतीने गोचर करणार शनि ग्रह आहे. महादशा, शनि साडेसाती आणि अडीचकीमध्ये सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे शनि जयंतीला खास उपास केल्यास फायदा होतो.

शनि जयंती पूजा विधी

  • वैशाख अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठून नित्यकर्म आणि स्नान उरकून घ्या. त्यानंतर पूजा विधी करण्याचा संकल्प करा.
  • घरी किंवा मंदिरात जाऊन शनिदेवांच्या मूर्तीवर तेल, फुलं आणि प्रसाद अर्पित करावं.
  • शनिवारी काळ्या उडदाची डाळ आणि तीळ देणं शुभं मानलं जातं
  • फुलं आणि फळांसोबत तुम्ही उडदाची डाळ आणि काळे तीळ शनिदेवांना अर्पण करू शकता.
  • मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनि चालिसेचं पठण करावं
  • शनिस्त्रोत आणि चालिसा पठणानंतर आरती करा
  • गरीबांना दान करा आणि दक्षिणा द्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.