Shani Sade Sati : कुंभ राशीच्या जातकांना साडेसातीपासून मुक्ती कधी मिळणार? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. असं असलं तरी पापग्रह म्हणून गणना केली जाते. शनिच्या प्रभावामुळे वाईट परिणामांना सामोर जावं लागतं. त्यामुळे भल्याभल्यांना घाम फुटतो.

Shani Sade Sati : कुंभ राशीच्या जातकांना साडेसातीपासून मुक्ती कधी मिळणार? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Shani Sade Sati : कुंभ राशीच्या जातकांना साडेसातीचा कितवा टप्पा, जाणून घ्या कधी मिळेल दिलासा
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 4:11 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या स्थितीला खूपच महत्त्व आहे. सर्वात धीम्या गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह असून ज्या राशीत स्थित असतो, त्या राशीच्या पुढच्या मागच्या राशीला साडेसातीचा त्रास सहन करावा लागतो. शनिदेवांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनिदेव कुंभ राशीत आहे. कुंभ ही शनिची स्वरास आहे. शनिदेव कुंभ राशीत विराजमान असल्याने मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर वृश्चिक आणि कर्क राशी अडीचकीच्या प्रभावाखाली आहेत. चला जाणून घेऊयात कुंभ राशीची साडेसाती कधी संपेल ते..

कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा

शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. या राशीच्या जातकांना साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. शनिदेवांनी 17 जानेवारी 2023 रोजी या राशीत प्रवेश केला होता. साडेसातीचा दुसरा टप्पा त्रासदायक मानला जातो. या कालावधीत जातकाला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं.

कुंभ राशीला साडेसातीतून कधी सुटका मिळेल?

शनिदेव कुंभ राशीत असल्याने मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा, कुंभ राशीला दुसरा टप्पा आणि मकर राशीला साडेसातीचा अंतिम टप्पा सुरु आहे. तसेच कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. कुंभ राशीला साडेसातीचा पहिला टप्पा 2019 मध्ये सुरु झाला आणि शेवटचा टप्पा 3 जून 2027 रोजी पूर्ण होईल. पण साडेसातीतून पूर्ण सुटका 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनि मार्गस्थ झाल्यावर मिळेल.

शनि साडेसातीत प्रभावी उपाय

  • शनि महादशा, साडेसाती आणि अडीचकी काळात निळ्या रंगाचा रुमाल कायम जवळ ठेवावा.
  • निळ्या रंगाचं फूल शनिदेवांना प्रिय आहे. यासाठी शनिवारी निळ्या रंगाचं फूल शनिदेवांना अर्पण करावं.
  • शनिवारी तेल अर्पण केल्याने अशुभ प्रभावापासून सुटका होते.
  • पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने शनिच्या अशुभ प्रभावापासून सुटका होते. शनिवारी पिंपळाला जल अर्पण करा.
  • शनिच्या प्रभावापासून दिलासा मिळवण्यासाठी शनिवारी काळे पादत्राणे, कपडे दान करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.