Year Ender 2023 : 2023 वर्षासाठी बाबा वेंगाने केल्या होत्या या भविष्यवाणी, यापैकी किती खऱ्या ठरल्या?
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये तिसरे महायुद्ध आणि अणुहल्ला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. याशिवाय या वर्षी पृथ्वीवर विनाशाचाही अंदाज वर्तवण्यात आला होता. अंदाजानुसार, 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना देखील घडण्याची अपेक्षा होती. याशिवाय, पृथ्वीच्या कक्षेत बदल होण्याची शक्यता सांगितली गेली, ज्यामुळे वातावरणातही बदल दिसून येतात.
मुंबई : भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्यावर अनेक जण विश्वास ठेवतात. कारण त्यांनी केलेले अनेक अंदाज खरे ठरले आहेत. बाबा वेंगा म्हणजेच बल्गेरियातील महिला वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होत्या, ज्यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. तर 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचे निधन झाले. बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंत भाकीत केले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याने सहा वर्षे आधीच आपल्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्याचप्रमाणे बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षासाठी काही धोकादायक भविष्यवाण्याही केल्या होत्या, यापैकी किती भाकिते खरी ठरली हे जाणून घेऊया.
2023 चे भाकित काय होते?
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये तिसरे महायुद्ध आणि अणुहल्ला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. याशिवाय या वर्षी पृथ्वीवर विनाशाचाही अंदाज वर्तवण्यात आला होता. अंदाजानुसार, 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना देखील घडण्याची अपेक्षा होती. याशिवाय, पृथ्वीच्या कक्षेत बदल होण्याची शक्यता सांगितली गेली, ज्यामुळे वातावरणातही बदल दिसून येतात.
तथापि, 2023 च्या घटनांवर नजर टाकल्यास, या वर्षी इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन यांच्यात मोठे युद्ध झाले, जे बाबा वेंगाचे भाकीत बर्याच अंशी खरे ठरते. ‘सौर त्सुनामी’ पृथ्वीवर विध्वंस करू शकते, असे बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत लिहिले होते. अंदाजाने चेतावणी दिली की यामुळे इंटरनेट, जीपीएस आणि रेडिओ सेवा विस्कळीत होऊ शकतात. तसेच, यामुळे आकाशात अरोरा दिसू शकतात.
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत नमूद केले आहे की 2023 मध्ये काही विचित्र वैज्ञानिक शोध लागतील, ज्याच्या मदतीने प्रयोगशाळेतही मुले तयार करता येतील. याशिवाय पालकही त्यांचा रंग आणि लिंग ठरवू शकतील. मुलांचा जन्म प्रयोगशाळेत होऊ शकतो, असे वृत्त आले असले तरी अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.
एखाद्या मोठ्या देशाने जैविक शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात हजारो लोकांचा बळी जाईल आणि प्रचंड वादळ येईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला होता. या दोन्ही गोष्टी या वर्षी जवळजवळ खऱ्या ठरल्या आहेत, कारण भारतासह अनेक पाश्चिमात्य देशांना वादळाचा तडाखा बसल्याच्या घटना घडल्या होत्या, ज्यामुळे खूप नुकसानही झाले होते.
बाबा वेंगा यांनी असेही भाकीत केले होते की पृथ्वीवर दुसऱ्या ग्रहाच्या सैन्याने हल्ला केला जाईल, ज्यामध्ये लाखो लोक मरतील. मात्र सध्या तरी अशी कोणतीही बातमी समोर आलेली नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)