वार्षिक राशी भविष्य: वृषभ राशिसाठी कसे जाणार 2023 वर्ष, करियर आणि आरोग्याच्या बाबतीत उतार-चढाव येणार का?

जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रयत्नांना यश मिळेल. विरोधक आपोआप शांत होतील...

वार्षिक राशी भविष्य: वृषभ राशिसाठी कसे जाणार 2023 वर्ष, करियर आणि आरोग्याच्या बाबतीत उतार-चढाव येणार का?
वार्षिक राशीभविष्यImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 2:25 PM

मुंबई, वृषभ राशीच्या (Yearly Horoscope Tarus) लोकांसाठी नवीन वर्ष 2023 खूप चांगले असणार आहे. वृषभ राशीच्या लाेकांसाठी हे वर्ष आर्थिक यशाचे वर्ष असेल. या नवीन वर्षात तुमचे नशीब तुम्हाला कितपत साथ देणार? पैसा, नातेसंबंध, करिअर-व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्यासाठी हे वर्ष कसे असेल?  वृषभ राशीच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष कोणत्या क्षेत्रात भाग्यशाली असेल ते जाणून घेऊया.

करिअर आणि व्यवसाय

2023 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक फयदा होणार आहे. अचूक योजना आणि प्रयत्नांसह कार्य क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी कराल. वर्षाचा बहुतांश भाग हा सकारात्मकतेचा संचार करणारा असेल. करिअर व्यवसायात यशाची पातळी अपेक्षेपेक्षा चांगली असेल. जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीचा काळ लाभदायक बदलांनी भरलेला असणार आहे.

राशीसाठी प्रभावशाली ग्रह शनिदेव सौभाग्य वाढवण्यास उपयुक्त आहे. परीक्षा स्पर्धेत अपेक्षित निकाल मिळेल. मुलाखतीत यश मिळेल. ज्येष्ठांच्या सहवासामुळे यशात वाढ होईल. पुरस्कृत केले जाऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी ओळख मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निकाली लागतील.

हे सुद्धा वाचा

एप्रिल ते जून या काळात जोखमीपासून सावध रहा

एप्रिल, मे आणि जूनचा काळ सावध राहण्याचा आहे. या काळात अनावश्यक साहस टाळावे. सकारात्मक सुधारणांमुळे उत्साही व्हाल. मित्र आणि सहकारी तुमच्यासोबत राहतील. आर्थिक व्यव्हारात सावधानता बाळगा. अचानक लाभ होण्याची चिन्हे आहेत. सक्रियता आणि समन्वयाने नवीन मार्ग खुले होतील.

जुलै ते सप्टेंबर महिना भाग्यदायी असेल

जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रयत्नांना यश मिळेल. विरोधक आपोआप शांत होतील. इच्छित गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. प्रियजनांशी समन्वय वाढेल. स्वाभिमानाची भावना वाढेल. तुमचे बोलणे आणि वागणे गोड ठेवा. ज्येष्ठांचा स्नेह व सहकार्य मिळेल.

जाणून घ्या कसा जाईल ऑक्टोबर ते डिसेंबर महिना

वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विविध क्षेत्रात सुरळीतपणे पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. दरम्यान, राहू-केतूच्या राशी बदलामुळे आव्हाने निर्माण होतील. कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. अडथळे निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक बाबींचा परिणाम करिअर-व्यवसायावर होऊ शकतो. महत्त्वाची कामे सुरुवातीलाच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. गुरु शनीचे संक्रमण सकारात्मक परिणाम टिकवून ठेवेल. धैर्याने, पराक्रमाने आणि सतर्कतेने यशाच्या मार्गावर राहाल. नकारात्मकता आणि निरुपयोगी चर्चा टाळा.

आरोग्य आणि कुटुंब

निरोगी राहाल. पूर्वीचे आजार दूर होतील. कुटुंबात सहजता आणि सौहार्द राहील. दिनचर्या नियमित होईल. नातेसंबंध सुधारतील. सुरुवातीच्या महिन्यांत शनि-गुरुची जोड महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयुक्त ठरेल. घरात शुभ कार्याची रूपरेषा तयार होईल. विविध कार्यक्रमांशी जोडले जाल. घरात सुख-सुविधा वाढतील.

प्रेम, मैत्री आणि शिक्षण

शैक्षणिक प्रयत्नांचे फळ मिळेल. अनुकूलतेची पातळी अपेक्षेपेक्षा चांगली असेल. एप्रिलपासून परिस्थिती आणखी सुधारेल. मित्रांची संख्या वाढेल. कुटूंबासाेबत प्रवास कराल. प्रेम प्रकरणांमध्ये सुधारणा होईल. प्रियजनांसोबत सुखद क्षण घालवाल. उच्च शिक्षणात अपेक्षित ध्येय गाठाल. परस्पर विश्वासाला बळ मिळेल.

धर्म अध्यात्म

लांबच्या धार्मिक प्रवासाची शक्यता राहील. स्वार्थाच्या संकुचिततेच्या पलीकडे जाऊन जनकल्याणाची भावना जपली जाईल. मोठेपणाने काम कराल. ध्यान, योगासनांवर भर असेल. सातत्य राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.