Yogini Ekadashi 2023 : या तारखेला आहे योगीनी एकादशी, राशीनुसार दान केल्याने दूर होतील समस्या
या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यासोबतच एकादशीचे व्रतही पाळले जाते. एकादशी व्रताचे अनेक कठोर नियम आहेत.
मुंबई : हिंदू पंचांगानुसार योगिनी एकादशी (Yogini Ekadashi 2023) दरवर्षी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. अशा प्रकारे 2023 मध्ये योगिनी एकादशी 14 जून रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यासोबतच एकादशीचे व्रतही पाळले जाते. एकादशी व्रताचे अनेक कठोर नियम आहेत. या नियमांचे पालन केल्यास व्रत यशस्वी मानले जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीवत करावी. यासोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी राशीनुसार या गोष्टींचे दान करावे.
राशीनुसार करा या गोष्टींचे दान
- मेष राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी एकादशीला गहू आणि गुळाचे दान करावे. भगवान विष्णूची कृपा योगिनी एकादशीला तांदूळ आणि साखर दान करा.
- योगिनी एकादशीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी गरजूंना पिवळे वस्त्र दान करावे.
- कर्क राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी लाडू दान करावे.
- योगिनी एकादशीच्या दिवशी गहू, तांदूळ आणि गूळ दान करा.
- भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी बूट किंवा चप्पल आणि भांडी दान करावी.
- तूळ राशीच्या लोकांनी सृष्टीचे रक्षक असलेल्या नारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी साखर आणि पाण्याचे दान करावे.
- योगिनी एकादशीला वृश्चिक राशीच्या लोकांनी देवाला प्रसन्न करण्यासाठी अन्नदान करावे.
- धनु राशीच्या लोकांनी विष्णूजींना प्रसन्न करण्यासाठी केळी, पिवळी मिठाई आणि पिवळे वस्त्र यांसारख्या पिवळ्या वस्तूंचे दान करा.
- माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी तांदूळ, साखर आणि तीळ दान करावे.
- कुंभ राशीच्या लोकांनी गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान करावे आणि पक्ष्यांना भोजन द्यावे.
- भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गूळ, गहू, तांदूळ आणि केळीचे दान करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)