Nifty : दिशा आणि दशा सोडा हो, चाल तर पाहा, निफ्टी पुन्हा मुसंडी मारणार!

Nifty : निफ्टी पुन्हा नवीन अध्याय लिहू शकते. निफ्टी नवीन इतिहास लिहिण्याच्या तयारीत आहे. आरबीआयच्या धोरणाचा लवकरच परिणाम दिसू शकतो.

Nifty : दिशा आणि दशा सोडा हो, चाल तर पाहा, निफ्टी पुन्हा मुसंडी मारणार!
तर होईल चमत्कार
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 7:54 PM

नवी दिल्ली : किती ही संकटे येऊ द्या, कोणी कितीही अंदाज वर्तवू द्या. शेअर बाजाराची दशा आणि दिशावर हजारो व्हिडिओ आणि लेख येऊ द्यात. विश्लेषण होऊ द्यात. परदेशी गुंतवणूकदारांचा (FPI) मूड बदलू द्यात. पण शेअर बाजाराने (Share Market) त्याची चाल स्पष्ट केली आहे. बाजारावर भारतीय फॅक्टर प्रभावी राहतील. उद्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पतधोरण समोर येईल. रेपो दरात वाढ होईल की नाही ते समोर येईल. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील काही मुद्यांचा, घडामोडींचा मोठा परिणाम होऊ शकतो. गेल्या आठवड्यात सेंसेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) हिरवे निशाण फडकावले आहे. निफ्टी 249.65 अंकांनी म्हणजे 1.41 टक्क्यांनी 17,854 अंकावर बंद झाला. त्यामुळे येत्या काही दिवसांत निफ्टी इतिहास रचणार असे भाकित बाजारातील तज्ज्ञ करत आहेत. बाजारावर कोणतेही संकट आले तरी येत्या दिवसांत निफ्टीला पुन्हा झळाळी येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बाजाराच्या चालीवर नजर टाकल्यास हा अंदाज खरा होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराचा मूड बिघडला होता. तर मंगळवारी बाजाराने पुन्हा गिरकी घेतली. बाजाराचा मूड स्विंग झाला. फायद्याचे गणित साधण्यासाठी जोरदार विक्री झाली.

तरीही बाजारात बँक निफ्टीने गुंतवणूकदारांना दिलासा दिला. मिडकॅपमध्ये पण तेजीचे सत्र दिसून आले. मेटल शेअरवर नफ्याचा मारा दिसून आला. या निर्देशकांत जोरदार विक्री झाली. ऊर्जा, ऑटो, आयटी शेअरवर नफाखोरीचा परिणाम दिसून आला. पण तरीही बाजाराचा बैल पुन्हा उधळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

कोटक सिक्युरिटीजचे अमोल अठावले यांनी याविषयीच्या परिस्थितीवर मत मांडले. त्यांच्यामते, 17,950 या स्तरावर 20 दिवसांच्या एसएमएवर पहिला अडथळा आला आहे. सध्या निफ्टीत 17,700 अंकांच्या वर टिकला आहे. त्यामुळे तेजीचे सत्र केव्हाही येऊ शकते.

निफ्टीला असाच पाठिंबा मिळाला तर निफ्टी पुन्हा एकदा 18,000 अंकांच्या वर जाईल. त्यानंतर निफ्टी 18,150 अंकावर पोहचले. पण जर समर्थन मिळाले नाही तर निफ्टी 17,700 अंकांपेक्षा खाली येईल. तर ही घसरण 17,500-17,400 अंकांवर स्थिरावेल.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, आरबीआय या बैठकीत रेपो दरात 25 आधार अंकांची वाढ करु शकते. त्यानंतर रेपो दर 6.50 टक्के होईल. आरबीआयने मे पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला.त्यानंतर त्यात सातत्याने घसरण झाली आहे. याचा परिणाम निफ्टीच्या वेगावर दिसून येईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.