डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला, ‘यांच्या’ सरकारकडून झालेली घोषणा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 33 वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. Dr.BR Ambedkar Bharat Ratna

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला, 'यांच्या' सरकारकडून झालेली घोषणा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 11:25 AM

मुंबई: भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारनं आजच्याच दिवशी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 33 वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तो दिवस 31 मार्च 1990 होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी भारतरत्न देण्यात आला. (Dr.BR Ambedkar was conferred Bharat Ratna Posthumously on March 31, 1990 by VP Singh Government )

31 मार्च 1990 ला मरणोत्तर भारतरत्न जाहीर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर तब्बल 33 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारनं हा पुरस्कार देण्याचं 31 मार्च 1990 घोषित केलं. 14 एप्रिल 1990 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

संविधान निर्मितीमध्ये महत्वाचं काम

भारतीय स्वांतंत्र्य लढ्याला यश येण्याची चिन्ह दिसत असताना भारतीय संविधान समितीची स्थापना करण्यात आली होती. संविधान समितीवर भारताची राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी होती. संविधान समितीनं त्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली आणि त्याची जबाबदारी डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलं. अखेर 26 नोव्हेंबर 1949 संविधान समितीनं राज्यघटना मंजूर केली.

मानवी हक्कांसाठी लढा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील दलित समाजातील नागरिकांच्या मानवी हक्कांसाठी लढा उभारला. महाड येथील चवदार तळे खुलं करणं असो किंवा नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीचं आंदोलन असो ही दोन्ही आंदोलनं मानवी हक्कांच्या लढ्यातील महत्वाची आंदोलन ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्क अधिकारांसाठी देखील लढा ऊभारला.

संबंधित बातम्या:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 370 ला विरोध का केला होता?

BLOG: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : अष्टपैलू आंबेडकर!

(Dr.BR Ambedkar was conferred Bharat Ratna Posthumously on March 31, 1990 by VP Singh Government )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.