Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special story | पाय कामातून गेल्यानंतर पोलिओवर औषध शोधण्यासाठी आयुष्य वेचणारा ‘हा’ अवलिया आहे तरी कोण?

पोलिओ (polio) रोगही त्यापैकी एक पोलिओ हो आजार संसर्गजन्य नसला तरी या आजाराने आतापर्यंत लाखो लोकांच्या आयुष्यात काळोख पेरला. (Franklin D Roosevelt polio)

Special story | पाय कामातून गेल्यानंतर पोलिओवर औषध शोधण्यासाठी आयुष्य वेचणारा 'हा' अवलिया आहे तरी कोण?
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 3:58 PM

मुंबई : महामारी काय असते हे आपल्याला कोरोना विषाणूमुळे समजलं. मात्र याआधीही असे अनेक साथीचे रोग येऊन गेले. प्लेगसाऱख्या रोगामुळे खेडेगावात मृत्यूचा खच पडे. मानवजातीचं अस्तीत्वच नष्ट होतं की काय असं तेव्हा वाटायचं. पोलिओ (polio) रोगही त्यापैकी एक. आजाराने आतापर्यंत लाखो लोकांच्या आयुष्यात काळोख पेरला. सामान्य माणसासारखं आयुष्य जगता येत नसल्याचं शल्य अशा अनेक पोलिओग्रस्तांना शेवटपर्यंत बोचत राहिलं. असं असलं तरी अमेरिकेत अशी एक दिग्गज व्यक्ती होती, ज्याला  स्व:तला जरी पोलिओ झाला असला तरी याच दिवशी म्हणजेच 3 जनेवारीला मोठ्या फाऊंडेशनची स्थापना करुन या व्यक्तीने पोलिओवर औषध शोधण्यासाठी आयुष्य वेचलं. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती फ्रँकलीन डी रुझवेल्ट (Franklin D Roosevelt) असं या व्यक्तीचं नाव. (Franklin D Roosevelt victim of polio who fought against polio)

रुझवेल्ट यांना 1921 साली वयाच्या 39 व्या वर्षी पोलिओ झाला. पोलिओमुळे त्यांचा एक पाय जवळपास कामातूनच गेला. 1921 नंतर रुझवेल्ट यांना पूर्ण आयुष्य असंच अपंग म्हणून काढावं लागलं. मात्र, त्यांनी पोलिओसमोर हार न मानता त्यावर लस शोधण्यासाठी जमेल त्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चक्क एका पोलीओ फाऊंडेशनची स्थापन केली. आज म्हणजेच 3 जानेवारीला या फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली होती. फाऊंडेशन फॉर इन्फेंटाइल पॅरालिसिस असं या फाऊंडेशनचं नाव होतं.

फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलिओवर लस शोधण्याचं काम

या फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलिओ या रोगावर लस शोधणे, संशोधन शोधणे अशा कामासाठी रुझवेल्ट यांनी मदत केली. तसेच पोलिओवर संशोधन करण्यासाठी त्यांनी निधी उभारला. मला पोलिओ झाला असला तरी नव्या पिढीचे या रोगापासून संरक्षण व्हावे, या भावेनतून त्यांनी पोलिओवर औषध शोधण्यासाठी जमेल त्या मार्गाने प्रयत्न केले. त्यांच्या या फाऊंडेशनमध्ये अनेक संशोधक होते. येथे संशोधनाचंच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणारी कामंसुद्धा केली जायची.

या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते अपंग व्यक्तींनासुद्धा मदत करायचे. त्या काळात अमेरिकेत पोलिओ रोगाने कहर केला होता. तेथे उन्हाळ्यात हजारो मुलांना पोलिओ व्हायचा. पोलिओचा विषाणू थेट मज्जासंस्थेवर परिणाम करतो. त्यामुळे हजारो मुले अपंग व्हायचे. फ्रँकलीन डी रुझवेल्ट यांनी या रोगावर लस शोधण्यासाठी संशोधकांना आर्थिक पाठबळ पुरवले.

रुझवेल्ट यांनीही पोलिओ

रुझवेल्ट यांना 1921 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी पोलिओ झाला. त्यानंतर त्यांचा एक पाय आयुष्यभरासाठी जवळपास निष्क्रीय झाला. मात्र, त्यांना झालेल्या या रोगाची खबर त्यांनी कुणालाच होऊ दिली नाही. History.com या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तत्कालीन माध्यमे, जासूस यांना ही बातमी न कळू देण्यासाठी मेगा प्लॅनिंग केलं होतं. त्यानंतर त्यांनी सामान्य लोकांचे या रोगापासून संरक्षण व्हावे हा उद्देश समोर ठेऊन काम केले.

रुझवेल्ट यांनी त्यांच्या फाऊंडेशनचं नाव नंतर बदलून मार्च ऑफ डाइम्स असं ठेवलं. आज पोलिओ काय आहे, हे कित्येकांना माहीतदेखील नाही. मात्र, पोलिओला थोपरवण्यासाठी त्या काळात फ्रँकलीन डी रुझवेल्ट यांनी शेवटपर्यंत काम केलं.

संबंधित बातम्या :

Fact check | कोरोना लसीमुळे खरंच नपुंसकत्व येतं?, जाणून घ्या नेमकं सत्य काय?

Corona Vaccine | कोरोना वॅक्सीनवरही ‘हराम’चा वाद, काय म्हणतायत मुस्लिम देश?

(Franklin D Roosevelt victim of polio who fought against polio)

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.