Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : ब्रश करायची मेहनत वाचवली, दात घासण्याचा मजेदार व्हिडीओ पाहून लोक हसून बेजार

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर एक मजेदार व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. केवल 15 सेकंदांचा हा व्हिडीओ आत्तापर्यंत 67 हजारांपेक्षा अधिक वेळा बघण्यात आला असून हजारो लोकांनी तो लाईकही केला आहे.

Viral Video : ब्रश करायची मेहनत वाचवली, दात घासण्याचा मजेदार व्हिडीओ पाहून लोक हसून बेजार
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 10:12 AM

सोशल मीडियावर (Social Media) रोज काही ना काही वेगळे, अनोखे व्हिडीओज शेअर होत असतात. काही व्हिडीओ व्हायरल (Viral Videos) होतात. तर काही व्हिडीओ एवढे मजेदार असतात की ते पाहून लोक हसून हसून बेजार होतात. दिवसाची एक मस्त सुरूवात करणाऱ्या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, हे नक्की. ट्विटर या (Twitter) मायक्रोब्लॉगिंग साईटवर, शेअर करण्यात आलेल्या या मजेशीर व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अनोख्या पद्धतीने दात घासताना दित आहे. सकाळी उठल्या उठल्या, अर्धवट झोपेत असतानाच, डोळ मिटून दात घासण्याची सवय बऱ्याच जणांना असते. ब्रश करण्यासाठी हातांची मेहनत तर लागतेच, हात न हलवता स्वच्छ दात घासणे जळजवळ अशक्यच आहे. मात्र ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये या व्यक्तीने दात घासायची मेहनत (Bruhing teeth with unique technique) वाचवण्यासाठी एक जुगाड केला आहे. कोणाला तरी अशा पद्धतीने ब्रश करताना तुम्ही क्वचितच पाहिले असेल.

आपण रोज सकाळ संध्याकाळ दात घासतो. मात्र दात घासण्याची ही अनोखी पद्धत पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमधील व्यक्तीने एका बंदुकीवर (खोटी) ब्रश फिट केला असून दात साफ करण्यासाठी तो बंदुकीचे ट्रिगर दाबताना दिसत आहे. ज्यामुळे ब्रश पुढे- मागे फिरत आहे. अशा पद्धतीने ती व्यक्ती समोरील आणि आतल्या बाजूचे दात स्वच्छ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बंदूकीच्या ट्रिगरचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. ते ऐकून असे वाटते, की कोणी खरंच बंदूक चालवत आहे. हा हैराण करणारा व्हिडीओ पाहून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून बरेच जण हसून लोटपोट झाले आहेत. तर काहींना हा व्हिडीओ तितकासा मजेदार वाटत नाही. सामान्यत: कोणी अशा पद्धतीने ब्रश करताना दिसत नाही. मात्र व्हिडीओतील ही व्यक्ती मात्र सहजपणे (खोटी) बंदूक चालवत दात स्वच्छ करताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

ट्विटरवर हा मजेदार व्हिडीओ The Darwin Awards नावाच्या आयडीने शेअर केला असून तो आत्तापर्यंत 67हजारांपेक्षा अधिक वेळा बघण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला असून शेकडो लोकांनी री-ट्विटही केले आहे. काही लोकांना हा व्हिडीओ अविश्वसनीय वाटतो. तर अनेकांनी त्यावर हसून बेजार झाल्याच्या कॉमेंट्स केल्या आहेत.

देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...