Krishna Prakash : कृष्ण प्रकाश यांनी सांगली जिल्ह्याला चांगले दिवस आणले, आजही लोकं करतात कौतुक
सांगली जिल्ह्यात असताना त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घाम फोडला, तो किस्सा अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे.
सांगली (Sangli) जिल्ह्यात हातभट्टी दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. त्यावेळी कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांची पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती सांगली जिल्ह्यात झाली. त्यावेळी कृष्ण प्रकाश यांनी दारू बंदीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच लोकांनी स्वागत केलं. संपूर्ण सांगली जिल्हा हातभट्टी दारु मुक्त झाला. आतापर्यंत तरी आमच्या शिराळा (Shirala) तालुक्यात हातभट्टी बंद आहे. कृष्ण प्रकाश सरांचं त्याबाबत आजही आमच्या भागात नाव निघतं. आज त्यांना हा किस्सा सांगितल्यावर खांद्यावर हात ठेवला. म्हणाले मित्रा, सामान्य लोकांसाठी काम करतो मी…
विशेष म्हणजे त्यावेळी सांगली जिल्ह्यात पेपरला दररोज वेगळ्या बातम्या येत होत्या. त्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली एवढंच होत. विशेष म्हणजे वडापच्या गाडीत बसून साद्या वेषात पोलीस स्टेशनला गाडी घेऊन जाणारा हा एकमेव अधिकारी असावा. त्यावेळी जिल्ह्यातील इतर अधिकारी सुद्धा चांगलेच सुधारले होते.
सांगली जिल्ह्यात असताना त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घाम फोडला, तो किस्सा अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. आपण पिक्चरमध्ये डॅशिंग अधिकारी बघितले, पण खरा डॅशिंग अधिकारी म्हणजे कृष्ण प्रकाश आहेत. आजही पुन्हा एकदा त्यांच्यासारख्या पोलिस अधीक्षकाची तीव्र गरज आहे असंही लोकं म्हणतात.
ज्या काळात सांगली जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची गरज होती. त्यावेळी कृष्ण प्रकाश यांची एन्ट्री झाली. त्यांनी संपुर्ण जिल्ह्याचा अभ्यास केला, त्यानंतर कारवाईला सुरुवात केली. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात अनेक गावात कृष्ण प्रकाश यांचं नाव निघतं. कारण त्यांनी त्यावेळी केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे जीव वाचले आणि संसार सुखी झाले.