कोविड न्यूमोनियाग्रस्त आईला वाचवण्यासाठी लेकीची धडपड, सोशल मीडिया,क्राऊडफंडिंगद्वारे 14 लाख उभारले
भाईंदर येथे राहणारी 23 वर्षांची जेनी फर्नांडिस तिच्या आईचा जीव वाचवण्यासाठी धडपडतेय. Jannie Fernandes Deepa Fernandes
मुंबई: भाईंदर येथे राहणारी 23 वर्षांची जेनी फर्नांडिस तिच्या आईचा जीव वाचवण्यासाठी धडपडतेय. जेनी फर्नांडिस जवळपास महिनाभरापासून आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळवण्याचं काम करतेय. जेनीची आई, दीपा फर्नांडिस या सिरीयस कोविड न्यूमोनियामुळे ग्रस्त असल्याने 18 एप्रिलपासून ICU बेड व व्हेंटिलेटरवर आहेत. दीपा यांच्यावर उपचारासाठी 40 लाखांचा खर्च येणार आहे. जेनी फर्नांडिसनं सोशल मीडियावरुन आतापर्यंत 14 लाख रुपये जमवले आहेत. (Jannie Fernandes collect 14 lakh rupees from social media for treatment of her mother Deepa Fernandes who suffer from covid pneumonia)
दीपा फर्नांडिस यांना 9 एप्रिलला कोरोना
जेनी फर्नांडिस यांची आई दीपा फर्नांडिस यांना कोरोना संसर्ग झाल्याचं 9 एप्रिलला समोर आलं. यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी 60 पर्यंत आली होती. मुंबईतील तीन रुग्णालयात फिरुन देखील जेनीच्या आईला पर्याय अभावी अंधेरीतील, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यासत आले. हे रुग्णालय, सामान्य मध्यम वर्गातील लोकांना न परवडणारे जरी नसले, तरी पैशांचा विचार न करता दीपा फर्नांडिस यांना येथे अॅडमिट करण्यात आले. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय हे एक चांगल्या सोयी सुविधा असणारं हॉस्पिटल आहे. तिथं खुल्या बाजारात उपलब्ध न होऊ शकणारी जीवनरक्षक औषध उपलब्ध होतील, असा आम्हाला विश्वास होता, असं जेनी फर्नांडिस यांनी सांगितलं.
एकूण खर्च 40 लाखांच्या जवळपास
आम्हाला व डॉक्टरांना माझी आई बरी होईल, अशी आशा आहे, असं जेनी म्हणते. जवळपास गेल्या महिनाभरापासून जेनीच्या आईचा उपचार सुरू आहे. दीपा फर्नांडिस या सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दीपा फर्नांडिस यांचा जीव वाचवणं हेच जेनी व तिच्या कुटुंबियांचे आयुष्याचे ध्येय झालेले आहे. दिवस रात्र, रुग्णालया बाहेर, जेनी व तिचे कुटुंबीय बऱ्या झालेल्या दीपा यांना घरी नेण्याची वाट पाहत आहेत व याच आशेत शर्तीचे प्रयत्न करत आहेत. दीपा यांच्या प्रकृतीची सध्याची स्थिती पाहली असता त्यांना अजून बरं होण्यासाठी दोन महिने लागतील. जीवनरक्षक औषधं आणि मेडिकलचं दिवसाचं बील 80 ते 90 हजारांच्या घरात आहे. एकूण खर्च जवळापास 40 लाखांच्या घरात आहे. दीपा फर्नांडिस यांच्या आरोग्य विम्याची खर्चाची मर्यादा संपून गेलेली आहे. त्यामुळे जेनी हिनं क्राऊडफंडीगद्वारे मदत गोळा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आतापर्यंत 14 लाख जमवले
सोशल मीडिया आणि क्राऊडफंडिंग सारख्या माध्यमातून जेनीने आईच्या खर्चासाठी 14 लाख इतकी रक्कम आईच्या उपचारासाठी उभारली आहे. “पुढील उपचारासाठी येणाऱ्या खर्चासाठी ही रक्कम अपुरी पडणार असल्यानं जेनीनं आत आम्ही मिलाप या क्राऊडफंडिंग साईटवर निधी उभारणी करणारी मोहिम राबवली आहे. मिलापच्या वेबसाईटवर सर्व बिले आणि इतर कागदपत्रे अपलोड केली आहेत”, असे जेनी यांनी सांगितले. कागदपत्रं पाहण्यासाठी क्लिक करा
फर्नांडिस कुटुंबीयांचे प्रयत्न सुरु
जेनी व तिच्या कुटुंबातील सदस्यांनी आईच्या उपचारासाठी लोन देखील घेतलेले आहे. अभिनेता सोनू सूद, अनेक आमदार, नगरसेवक व एनजीओपर्यंत मदतीची हाक दिली. अजूनही जेनी फर्नांडिस यांनी त्यांच्या आईला वाचवण्यासाठीचे प्रयत्न व अशा सोडलेली नाही “माझ्या आईच्या पुढील उपचारासाठी जरी आपण आर्थिक सहाय्य करण्यास सक्षम नसालत तरी, कृपया माझी आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा, असे जेनी फर्नांडिस यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणीhttps://t.co/M9rVlc86OW#Corona #CoronaVaccina #Vaccination #MumbaiVaccination #BMC #BMCglobalvacccinetender #MumbaiVaccination #CoronaPandemic
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनातून बरे झाल्यानंतरही नव्याच आजाराचं संकट; जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार?
पालिकेचा धमाका, विनामास्क फिरणाऱ्या 8 लाख लोकांवर कारवाई, 17 कोटींचा दंड वसूल
(Jannie Fernandes collect 14 lakh rupees from social media for treatment of her mother Deepa Fernandes who suffer from covid pneumonia)